33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयIAS टीना डाबी यांच्यावर कारवाई होणार; विस्तापित पाकिस्तानी हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी अडचणी...

IAS टीना डाबी यांच्यावर कारवाई होणार; विस्तापित पाकिस्तानी हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी अडचणी वाढल्या

राजस्थानमधील जैसलमेर जिल्हा मुख्यालयापासून ४ किमी दूर असलेल्या अमरसागर येथील पाकिस्तानातून विस्थापित म्हणून आलेल्या हिंदूंची घरे पाडल्याप्रकरणी जिल्हाधिकारी टिना डाबी अडचणीत सापडल्या आहेत. जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी यांनी अतिक्रण विरोधी कारवाई करत येथील ५० हून अधिक कच्ची घरे बुलडोजर आणि जेसीबीने पाडून टाकली. या प्रकरणात आता गेहलोत सरकारमधील मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी प्रतिक्रीया दिली असून ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

मंत्री खाचरियावास म्हणाले, अधिकाऱ्यांनी जे केले ते चुकीचे होते. त्याबद्दल त्यांना खुलासा करावा लागेल. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करु. जैसलमेरमध्ये पाकिस्तानी हिंदू विस्थापित मोकळ्या जागेत राहतात. राजस्थान सरकार त्यांना कागदपत्रे देत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत घोषणा केली आहे. राजस्थान सरकारच्या कायद्यानुसार आपण कोणाचेही पुनर्वसन केल्याशिवाय त्यांना बेदखल करु शकत नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यांमुळे त्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. पुढे ते म्हणाले, कोणीही कलेक्टर असो, कोणीही अधिकारी असो हे गहलोत सरकारविरोधात षडयंत्र आहे. जे विनाकारण सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा अधिकाऱ्यांची जरुर चैकशी झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी पाप केले असून त्यांना त्याचे परिनाम भोगावे लागतील.

हे सुद्धा वाचा

मैत्रिणीला मिठीत घेतले, मग गोळ्या झाडून केली हत्या; स्वत:ही केली आत्महत्या

…म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांचे कोटी कोटी आभार

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या शपथ घेणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती

जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशानुसार पाकिस्तानातून विस्तापित म्हणून आलेल्या हिंदू कुटुंबांच्या घरांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. त्यात 150 हून अधिकजण बेघर झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार विस्थापित नागरिक अमर सागर तलावाच्या किनाऱ्यावर अनधिकृतपणे घरे बांधून राहत होते. त्यामुळे तलावात पाणी येण्यास अडथळा येत होता. तर दुसरीकडे विस्थापितांनी सरकारच्या आदेशाने कारवाई झाल्याचा आरोप देखील केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी