29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराष्ट्रीयजेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी...असे का म्हणाले अमित शाह ?

जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी…असे का म्हणाले अमित शाह ?

इंडिया आघाडीला देशभरात मिळत असलेला पाठिंबा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसांपासून काहीसे गोंधळलेले, चिडलेले दिसत आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याच वाटेने जात असल्याचे पहायला मिळत आहे. आज बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलताना ते म्हणाले की, ‘जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे. ती कधीही मिसळणार नाहीत. मी नितीश बाबूंना सांगू इच्छितो की स्वार्थ कितीही उच्च असला तरीही, पाणी आणि तेल कधीही एक होत नाही. एकतर तेलाकडे गमावण्यासारखे काही नसते, ते फक्त पाण्याचे नुकसान करते. तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी जी युती केली आहे, ती युती तुम्हाला सत्तेवरुन खाली  खेचणार आहे.’ असेही ते म्हणाले.

हैदराबादमध्ये इंडिया आघाडीच्या काही नेत्यांची आज बैठक झाली. असे असताना एनडीएच्याही विविध ठिकाणी बैठक सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बिहार दौऱ्यावर होते. मधुबनी येथील झंझारपुरमध्ये सभेत बोलताना त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. बिहार मधल्या लालू- नितीश सरकारने रक्षाबंधन आणि जन्माष्टमी या सणाच्या सुट्ट्या रद्द केल्या. त्यावर आपण सहमत आहात का, असाही सवाल शाह यांनी केला.

जी-२० च्या माध्यमातून मधुबनी पेंटिंग आणि नालंदा विश्वविद्यालयाची जग भारत नव्याने ओळख निर्माण झाली आहे. असे असताना बिहार हे राज्य पुन्हा जंगलराजकडे वाटचाल करत आहे. लालू- नितीश यांच्या सरकारच्या काळात लूटमार, पत्रकार, दलितांच्या हत्या वाढू लागल्या आहेत. असे सरकार तुम्हाला पुन्हा पाहिजे का, असा सवाल शाहा यांनी केला. अयोध्येत राम मंदिर खूप वर्षापूर्वी निर्माण झाले पाहिजे होते. पण लालू आणि नितीश कुमार यांच्या सरकारने हे काम रोखून ठेवले. पण आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केल्यानंतर मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. येत्या जानेवारीत रामाची प्रतिष्ठापना या मंदिरात होईल, असेही शाह म्हणाले.
हे सुद्धा वाचा 

IAS टीना डाबी यांच्या घरात पाळणा हलला; गोंडस बाळाला दिला जन्म
मृणालच्या करिअरला चार चाँद; दुबईत झाला मोठा सन्मान
गणेशोत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा : डॉ. जितेंद्र आव्हाड

आमच्या सरकारच्या कार्यकाळात दरभंगा एयरपोर्ट नरेंद्र मोदी यांनी बनवले. तीन वर्षात या विमानतळावरून १६ लाख प्रवाशांनी प्रवास केला. ४० कोटी खर्च करून हे विमानतळ सुसज्ज करण्यात येत आहे, असेही शाह यांनी सांगितले. नितीश कुमार यांनी एम्ससाठी ८१ एकर जमीन दिली नाही. त्यामुळे साडेबारा हजार कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचे काम थांबले, असंही आरोप शाह यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी