29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरराष्ट्रीयArvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी नाही!

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी नाही!

आशिया खंडातील सर्वाधिक 10 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरे असून यात दिल्लीचा समावेश नसल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. एका अहवालाचा दाखला देत त्यांनी हा दावा केला आहे.

आशिया खंडातील सर्वाधिक 10 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरे असून यात दिल्लीचा समावेश नसल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. एका अहवालाचा दाखला देत त्यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक शहर मानले जात होते. मात्र आता दिल्ली हे प्रदुषित शहर नाही. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, आशिया खंडातील 10 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरे असून त्या यादीमध्ये दिल्लीचे नाव नाही. काही वर्षांपूर्वी दिल्ली हे सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक शहर होते, मात्र आता नाही. पण अजूनही खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे, असे देखील ते म्हणाले.

केजरीवाल म्हणाले, दिल्लीचे नागरिक खुप मेहनत करतात, आज आम्ही मोठा बदल घडवून आणला आहे. मात्र अजूनही मोठा टप्पा आम्हाला गाठायचा आहे. आम्ही मेहनत करू जेणे करून आम्हाला जगातील स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळेल. आम्ही दिल्लीला जगातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्यासाठी कटीबद्ध आहोत.

— ऐन दिवाळीत दिल्लीची हवा खराब
ऐन दिवाळीमध्ये प्रदुषणाचा स्तर वाढला आहे. आज (सोमवारी) सकाळी रविवारच्या तुलनेत दिल्ली आणि नोएडाच्या प्रदुषणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. SAFAR इंडिया एअर क्वालिटी सर्व्हिसच्या नोंदीनुसार दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 276 इतका नोंदविला गेला. हा निर्देशांक खुपच खराब मानला जातो. तर नोएडाचा AQI 309 इतका नोंदविला गेला. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदुषणाचा स्तर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिल्ली-एनसीआर परिसरात धानाचा पेंढा (पराली) जाळण्यामुळे पुढे आणखी प्रदुषण वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पेंढा (पराली) न जाळण्याबद्दल आवाहन करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Aastha Sidana : बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिदानाला ऑनलाईन गंडा; तब्बल इतक्या लाखांची फसवणूक

Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे १९९९ मध्ये मुख्यमंत्री होणार होते, पण शिवसेनेने…

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

– दिल्लीत फटाक्यांना बंदी
प्रदुषण रखण्यासाठी दिल्लीत फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे. बंदीचा नियम मो़डून जर कोणी फटाके वाजवताना आढळून आला तर त्या व्यक्तीला 200 रुपये दंड आणि 6 महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर फटाके विक्री आणि साठा ठेवल्यास 5 हजार रुपये दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!