28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयभारतीय आयुर्विमा मंडळाची सुरुवात कधी झाली माहितेय का?

भारतीय आयुर्विमा मंडळाची सुरुवात कधी झाली माहितेय का?

तुम्हाला दूरदर्शनवरील ‘जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ जाहिरात आठवते का? समस्त भारतीयांना विमाकवच पुरवणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाची जाहिरात 90 साली जन्मलेल्या मुलांची दूरदर्शन काळातली सर्वात आवडती जाहिरात. आज 1 सप्टेंबरला भारतीय आयुर्विमा महामंडळाला 67 वर्ष पूर्ण झाली.

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना 1 सप्टेंबरला 1956 रोजी झाली. संस्कृत भाषेतील ‘योगक्षेमम वहाम्यहम’ म्हणजेच ‘तुमची समृद्धी,आमचे कर्तव्य’ हे बोधवाक्य भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश प्रतीत करते. ‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्यूपासते | तेषा नित्याभियुक्तानां योक्षेमम् वहाम्यहम ||’ हा संस्कृत भाषेतील श्लोकही भारतीय आयुर्विमा महामंडळाने वापरत विमा कवच घेण्यासाठी भारतीयांना आवाहन केले. भारतीयांना आर्थिक संरक्षण देणे, वाजवी दरात विमा कवच पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट ध्यानात ठेवून केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना केली.

19 जून 1956 रोजी संसदेत एलआयसी कायदा अमलात आणला गेला. सुमारे 245 भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेत या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यातून 1 सप्टेंबर 1956 ला एलआयसी ची स्थापना झाली. जीवन विमा, म्युचल फंड, गृहकर्ज एलआयसीच्या माध्यमातून भारतीयांना वाजवी दरात उपलब्ध करण्यात आले.

हे ही वाचा 

भारतीय रेल्वेच्या 105 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याकडे अध्यक्षपद

एअर होस्टेसने असे केले इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे स्वागत; व्हिडीओ व्हायरल !

एकता कपूरचे करावे तेवढे कौतुक थोडेच, एमी अवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय महिला !

मुंबईत एलआयसीच्या मुख्य कार्यालयाची स्थापना करण्यात आली. देशभरात 8 क्षेत्रीय कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 2 हजार 48 शाखा, 54 ग्राहक सेवा आणी 25 महानगर सेवा एलआयसीच्यावतीने स्थापन करण्यात आल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी