31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराष्ट्रीयबॅंकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या मल्ल्याला फक्त दोन हजारांचा दंड

बॅंकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या मल्ल्याला फक्त दोन हजारांचा दंड

टीम लय भारी

नवी दिल्ली : फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या सोबतच त्याला 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयाने मल्ल्याला चार आठवड्यांच्या आत आठ टक्के व्याजासह 4 कोटी डॉलर जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाईल. 9 जून 2017 रोजी, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मल्ल्याने 40 दशलक्ष डॉलर त्याच्या तीन मुलांच्या नावे हस्तांतरित केले होते. त्यानंतर तो न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. मल्ल्याला 2017 मध्ये अवमान प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

न्यायालयाने मल्ल्याला चार आठवड्यांच्या आत आठ टक्के व्याजासह 4 कोटी डॉलर म्हणजेच 31 कोटी 76 लाख 42 हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाईल. 9 हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी विजय मल्ल्याविरुद्ध अवमान खटल्यातील शिक्षेबाबत युक्तिवाद झाल्यानंतर 30 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

बँकांची कोट्यवधींची फसवणूक करून फरारी झालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या याला लंडनच्या हायकोर्टाने दिवाळखोर ठरवलं आहे. किंगफिशर एअरलाइन्स डबघाईला गेल्याने विजय मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बँकांकडून ९९९० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड मल्ल्या करू शकला नाही. एसबीआयच्या नेतृत्वात १३ बँकांच्या संघटनेने कर्ज वसुलीसाठी मल्ल्याच्या हस्तांतराची मागणी केली होती.

मनी लाँड्रींगविरोधी कायद्यानुसार किंगफिशर एअरलाइन्स जप्त केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून एसबीआयच्या नेतृत्वातील कर्जदात्यांनी ७९२, ११ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. प्रकरणी जवळपास ५८ टक्के रक्कम बँका आणि सरकारला परत मिळाली, असे ईडीने म्हटलं होतं.

हे सुध्दा वाचा:

गोगलगायीच्या त्रासाने धनंजय मुंडे वैतागले!

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा, आता सुरू होणार मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग

OBC आरक्षणावर आज न्यायालयात निकाल, पण त्या अगोदरच धनंजय मुंडेंनी दिले २७ टक्के आरक्षण !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी