29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराष्ट्रीयशरद पवारांच्या उपस्थितीत 'मार्गारेट अल्वा' यांनी भरला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज

शरद पवारांच्या उपस्थितीत ‘मार्गारेट अल्वा’ यांनी भरला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज

टीम लय भारी

नवी दिल्लीः उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून ‘मार्गारेट अल्वा’ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत संसदेत अल्वा यांनी नामांकन अर्ज दाखल केला.

येत्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार आहे. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली होती. अल्वा यांच्या नावाला 17 विरोधी पक्षांची मान्यता मिळाली आहे.

या पदासाठी एनडीएकडून जगदीप धनकड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. एनडीएतर्फे जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज सोमवारी 18 जुलै रोजी दाखल केला. हा अर्ज भरतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाए संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

आज 19 जुलै हा या पदासाठीचे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम, व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे. सोमवारी 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी जाहीर केला जाईल.

हे सुध्दा वाचा

खासदार राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग

‘या‘ माफियांना कोणाचा आशिर्वाद ?

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!