29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराष्ट्रीयआमदार अपात्रता सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की...

आमदार अपात्रता सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ?

महाराष्ट्रात हे सारे नाट्य घडले, त्यावेळी विधानसभेला अध्यक्ष नव्हता. त्यामुळे उपाध्यक्ष असलेले झिरवाळ हे हंगामी अध्यक्ष होते. आता झिरवाळ हे उपाध्यक्ष आणि नार्वेकर हे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, विशेषत: 16 आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ? हाही औत्सुक्याचा मुद्दा आहे. त्याविषयी सुप्रीम कोर्टातील मराठी वकिलांची मते जाणून घेऊया.

शिंदे सेनेतील 16 आमदारांची अपात्रता आणि एकूणच शिंदे सरकारचे भवितव्य याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे. 15 मे च्या आत हा निर्णय येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, विशेषत: 16 आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ? हाही औत्सुक्याचा मुद्दा आहे. त्याविषयी सुप्रीम कोर्टातील मराठी वकिलांची मते जाणून घेऊया.

अॅड. सिद्धार्थ शिंदे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास तो आता या सर्व वादापूर्वीचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे नाही जाणार. आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेच हे प्रकरण जाईल. याशिवाय, सुप्रीम कोर्टाने जरी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले तरी ते काही तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावे नसेल. कारण ते आता महाराष्ट्रातून उत्तराखंडात गेले आहेत. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोर्टाचे निरीक्षण, ताशेरे हे सारे त्या पदासाठी असतील, कुणा विशिष्ट व्यक्तीला उद्देशून नसतील.

महाराष्ट्रात हे सारे नाट्य घडले, त्यावेळी विधानसभेला अध्यक्ष नव्हता. त्यामुळे उपाध्यक्ष असलेले झिरवाळ हे हंगामी अध्यक्ष होते. आता झिरवाळ हे उपाध्यक्ष आणि नार्वेकर हे अध्यक्ष आहेत. आता सुप्रीम कोर्टाने प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे परत पाठविले तरी ते अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडेच जाईल. तेव्हा झिरवाळ यांनी अध्यक्ष या नात्याने 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा बाजावल्या होत्या. मात्र, अपात्रतेचा निर्णय झालेला नव्हता. आमदारांना 2 दिवसात नोटीशीला उत्तर द्यायचे होते. मात्र, शिंदे सेना कोर्टात गेली. 2-3 दिवस कमी असल्याने वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी शिंदे सेनेने केली. त्यावर कोर्टाने आमदारांना अपात्रता नोटीशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला आणि गेल्यावर्षी 12 जुलै रोजी यातील सुनावणी ठेवली होती.

 

आता याला अजून 10 महीने उलटूनही त्या 16 आमदारांनी अपात्रता नोटीशीला कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे अध्यक्षांना एका निश्चित कालावधीत निर्णय घेण्याची सूचना कोर्ट अध्यक्षांना करू शकते. त्यावर आक्षेप असणारा पक्ष पुन्हा सुप्रीम कोर्टात अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागू शकतो. अर्थात हे सुप्रीम कोर्ट आहे. न्यायदानाचे सर्वोच्च आणि अंतिम स्थान आहे. सर्वजण कायदेशीर चाकोरीत शक्यता व्यक्त करत आहेत. मात्र, सुप्रीम कोर्ट कुठल्याही चाकोरीबाहेर, अगदी अनपेक्षित निर्णयही घेऊ शकते. पाचही न्यायाधीश के निर्णय घेतील, ते त्यांनाच ठावूक.

हे सुद्धा वाचा : 

  1. शिंदे सरकार जाणार की राहणार? निकालाबाबत पाच न्यायाधीशात सहमती नसेल तर?
  2. न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल आला नाही तर काय?
  3. महाराष्ट्रातील प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाऊ शकते, की सुप्रीम कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवू शकते?

या पंधरवड्यात कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल माईलस्टोन असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार की जाणार ? या संदर्भात “झी 24 तास” वृत्तवाहिनीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील मराठी वकीलांशी खास बातचीत केली. अॅड. सिद्धार्थ शिंदे, अॅड. आकाश काकडे, अॅड. कश्मीरा लांबट, अॅड. श्वेतल शेफाल, अॅड. यतीन जगताप, अॅड. प्रशांत केंजळे, अॅड. राज पाटील ही अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारी दिग्गज मंडळी “झी 24 तास”च्या वार्तालापात सहभागी झाली होती.

MLA Disqualification, Maharashtra Vidhansabha, Rahul Narvekar, Narhari Zhirwal Advt Siddharth Shinde

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी