29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनी पवारांवर बोलणे टाळले, मोदींवर साधला निशाना

उद्धव ठाकरेंनी पवारांवर बोलणे टाळले, मोदींवर साधला निशाना

राज्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरु आहेत. महाविकास आघाडीत कुरघोडी सुरु असल्याचे बोलले जात आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मविआत माझ्याकडू तडा जाईल असे होणार नाही, तसेच मविआला तडा जाईल असे राष्ट्रवादीत काही होणार नाही असे त्यांनी सांगितले. पवारांनी आपल्या आत्मचरित्रात ठाकरेंवर केलेल्या टिपण्णीबाबत विचारले असता तो मुद्दा त्यांनी दुर्लक्षित केला. मात्र कर्नाटक निवडणुकीत मोदींच्या प्रचारावर मात्र त्यांनी या पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे उद्धव महाविकास आघाडी अबाधित रहावी अशीच भुमिका ठाकरे यांची असल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यात उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांनी टिपण्णी केली आहे. त्याबद्दल ठाकरेंना विचारण्यात आले असता ते म्हणाले, शरद पवार यांना सल्ला देणारा मी कोण? आणि दिलेला सल्ला त्यांना पचनी पडेल का? असे म्हणत तो विषय त्यांनी टाळला, मात्र याच पत्रकार परिषदेत मोदींवर मात्र त्यांनी टिका केली.

कर्नाटक निवडणुकीत ‘बजरंग बली की जय’ म्हणून मतदान करा असे मोदींनी मतदारांना आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने धार्मिक आवाहन केल्याने बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. मात्र आता नियम बदलले असतील असा टोला लगावत देशाचे पंतप्रधान हिंदूत्त्वाचा प्रचार करत असतील तर, कर्नाटकातील मराठी जनतेने ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत मतदान करावे असे आवाहन केले.

हे सुद्धा वाचा

फ्लॅट धारकांची फसवणूक निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डराना जामीन नाकारला

मनी लॉंड्रिंग प्रकरण दाऊद गँग ईडीच्या रडारवर

राऊत आणि पटोले : कोण चोमडे, कोण चाटू ? महाविकास आघाडीत शाब्दिक गुद्दागुद्दी

सीमाभागातील मराठी भाषिकांची एकजूट रहावी. सीमाभागातील नागरिकांनी भाजपच्या विरोधात मतदान करावे असे आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले. मराठी नागरिकांनी मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करावे, त्यांनी जय भवानी जय शिवाजी म्हणत मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तरी मराठी भाषिकांवर अन्याय होतो. त्यामुळे तेथील मराठी नागिकांनी एकजूट तुटू देऊ नये असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी