28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरराष्ट्रीयप्राइम मिनिस्टर ऑफ भारत; मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या पत्रकावर उल्लेख

प्राइम मिनिस्टर ऑफ भारत; मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या पत्रकावर उल्लेख

दिल्लीत जी 20 परिषदेच्या बैठकीनिमि्त्त राष्ट्रपती भवनतर्फे भोजनाच्या निमंत्रणासाठी काढण्यात आलेल्या पत्रकात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच आता खुद्द पंतप्रधान मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यासंदर्भात काढण्यात आलेल्या एका पत्रकावर प्राइम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

पंतप्रधान मोदी 20 व्या आसियान-भारत बैठकीसाठी इंडोनेशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यासंबंधी काढण्यात आलेल्या एका पत्रकावर प्राइम मिनस्टर ऑफ इंडिया ऐवजी प्राइम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे इंडिया आणि भारत नावावरुन आता पुन्हा वाद पेटला आहे. राष्ट्रपती भवनच्या निमंत्रण पत्रिकेवरील भारत या नावाबद्दल वाद सुरु झाल्यानंतर मोदींच्या दौऱ्याचे पत्रक समोर आले आहे.

विरोधी पक्ष कॉँगेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रसे (पवार गट) यांनी याबाबद टिपण्णी करत सरकारला लक्ष्य केले. देशातील विरोधी पक्षांनी मोदीसरकार संघराज्यपद्धतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे, तसेच संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार यासंबंधी बिल आणण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा 
जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक
संविधानातून ‘इंडिया’ शब्द काढून टाकण्याचा मोदी सरकाचा डाव; विरोधकांचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. आज (दि.6) आणि उद्या (दि.7) इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे ही भेट होणार आहे. इंडोनेशिया हा आसियानचा सध्याचा अध्यक्ष आहे. आता, पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटमध्ये, पंतप्रधान मोदींना ‘प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया’ असा उल्लेख करण्याच्या नेहमीच्या प्रथेऐवजी ‘प्राइम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी