28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटेक्नॉलॉजीWhatsApp युझर्ससाठी महत्त्वाची बातमी; होणार आहेत मोठे बदल

WhatsApp युझर्ससाठी महत्त्वाची बातमी; होणार आहेत मोठे बदल

जगभरात व्हाट्सअॅप ही मेसेंजर अॅप लोकप्रिय आहे. भारतात देखील लाखो युजर्स आहेत. व्हाट्सअॅप युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आता अॅपमध्ये मोठे बदल केले जात आहेत. नवे अपडेट्स आणि फीचर्स आता व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी घेऊन येत आहे.

व्हाटस्अॅप हे युजर फ्रेंडली असल्याने ते अल्पावधीत लोकप्रिय ठरले. व्हॉट्सअॅपने युजर्सची गरज लक्षात घेऊन वेळोवेळी अनेक अपडेट्स केले असून मेसेजेस, फोटो, व्हिडीओ शेअरींगसोबत व्हॉस्टअॅपव्दारे पैसे पाठविण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर बिझनेससाठी व्हॉट्सअॅप बिझनेस देखील उपलबध करुन दिले आहे. आता व्हॉट्सअॅपमध्ये काही बदल करण्यात येत असून मेटा कंपनीने त्यावर काम सुरु केले आहे. लवकरच व्ह़ॉट्सअॅपचा इंटरफेस बदलणार आहे, तसेच टॉप अपबार मध्ये देखील बदल होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नवे डिझाइन आल्यानंतर व्ह़ॉट्सअॅपची वरील पट्टी पांढऱ्या रंगात दिसणार आहे. व्हॉट्सअॅपचा संपूर्ण लुकच त्यामुळे बदललेला पहायला मिळू शकतो. नव्या डिझाइनची चाचणी सुरु आहे. त्यासाठी अॅड्रोईड बिटा व्हर्जन 2.23.18.18 वर प्रयोग सुरु आहेत. WABetaInfo या साइटने याबाबत माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा 
सनी देओल-अमिषा पटेलच्या आयुष्यात भाग्योदय; गदर 2 ची 500 कोटींची कमाई
जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक

व्हॉट्सअॅपचे हे नवे बीटा व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येऊ शकते. दरम्यान नव्या डिझाइनचा एक स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे, मात्र याबाबत ‘मेटा’ व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे नवे व्हर्जन कधीपर्यंत युझर्सना वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकते याबाबत देखील अद्याप काही माहिती मिळालेली नाही. दरम्यान व्हॉट्सअॅपने स्पर्धेत अग्रक्रमावर राहण्यासाठी आता हाय रेझ्युरेशन व्हिडीओ आणि फोटो पाठविण्याची सुविधा देखील युझर्सना उपलब्ध करुन दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी