30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराष्ट्रीयमी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य; बोहरा मुस्लीम समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार!

मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य; बोहरा मुस्लीम समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (शुक्रवार, दि.१०) रोजी मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेन तसेच दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाच्या (Bohra community) ‘अल् जामिया-तूस-सैफिया’ या संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. मरोळ येथे बोहरा समाजाच्या संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले, माझे बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून नाते. तुमच्या कुटुंबातील एक सदस्यासारखा आहे. महिलांच्या शिक्षणासाठी या संस्थेचा नेहमी प्रयत्न असतो असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. (Prime Minister Narendra Modi praises the Bohra community)

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, माझी बोहरा समाजाकडे एक तक्रार आहे. तुम्ही कृपया त्यात सुधारणा करावी. आपण मला नेहमी आदरणीय पंतप्रधान म्हणता. पण, मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून नाही. माझे भाग्य असे आहे की, जे कदाचित फार कमी लोकांना मिळाले. मी चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. सर्व 4 पिढ्यांनी माझ्या घरी भेट दिली. मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्यासारखा असल्याचे देखील मोदी यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घ्या

दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या “पास आऊट” लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा

बारावीच्या परीक्षांना बसतोय शिक्षकेतर कर्मचारी संपाचा फटका!

पतप्रधान मोदी बोहरा समाजाचे कौतुक करताना म्हणाले की, बदलता काळ आणि विकासाच्या निकषावर बोहरा समाजाने नेहमीच स्वत:ला सिद्ध केले आहे. अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. परदेशातही गेल्यानंतर माझे बोहरा भाऊ-बहीण मला भेटण्यासाठी येतात असे देखील मोदी यावेळी म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी