29 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयआदित्य ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट

आदित्य ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शुक्रवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री (Tamil Nadu Chief Minister) एम. के. स्टॅलिन (MK Stalin) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि करुणानिधी यांच्या भेटीचा फोटो स्टॅलिन यांना भेट दिला. तामिळनाडू राज्य शाश्वत विकास, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या दिशेने उपाययोजनांमध्ये मोठी प्रगती करत आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्याचा खरोखरच कौतुकास्पद विकास होत असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (Aditya Thackeray meets Tamil Nadu Chief Minister MK Stalin)

चेन्नई (Chennai) येथे द न्यू इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तसमूहाच्या थिंक एज्यू 2023 या विशेष चर्चासत्रात पर्यावरणातील बदल या विषयावरीच चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांना भेटीसाठी निमंत्रीत केले होते. आदित्य ठाकरे यांनी स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.


करुणानिधी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सन १९७८ साली भेट मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट झाली होती. आदित्य ठाकरे आणि एम.के. स्टॅलीन यांच्या भेटीत या बाळासाहेब ठाकरे आणि करुणानिधी यांच्या भेटीतील आठवणींना उजाळा मिळाला.

हे सुद्धा वाचा

मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य; बोहरा मुस्लीम समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार!

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घ्या

दिग्दर्शक राहुल सूर्यवंशी यांच्या “पास आऊट” लघुपटला आंतरराष्ट्रीय दर्जा

आदित्य ठाकरे यांनी स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू सरकारच्या विविध विकास कामांचे तसेच राज्याच्या प्रगतीचे यावेळी कौतुक केले. तामिळनाडू राज्याचा शाश्वत विकासाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास, तसेच पर्यावरण आणि हवामान बदलाच्या संदर्भात सुरु केलेल्या उपाययोजनांचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी