36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयरविश कुमार यांचा एनडीटीव्हीचा राजीनामा

रविश कुमार यांचा एनडीटीव्हीचा राजीनामा

एनडीटीव्हीवर अदानी ग्रुपने ताबा मिळविल्यानंतर मंगळवारी प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ बुधवारी एनडीटीव्ही हिंदीचे अँकर रविश कुमार यांनी देखील राजीनामा दिला आहे.

एनडीटीव्हीवर अदानी ग्रुपने ताबा मिळविल्यानंतर मंगळवारी प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ बुधवारी एनडीटीव्ही हिंदीचे अँकर रविश कुमार यांनी देखील राजीनामा दिला आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार एनडीटीव्हीच्या अध्यक्षा सुपर्णा सिंह यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या इ-मेल नुसार रविश कुमार यांनी राजीनामा दिला असून कंपनीने त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. रविश कुमार यांना पत्रकारीतेतील योगदानाबद्दल रेमन मेगेसेस पुरस्कार,तसेच दोन वेळा रामनाथ गोयंका पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांचे हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाईमचे शो अंत्यत अभ्यासपूर्ण असत.

एनडीटीव्हीचे शेअर्स अदानी ग्रुपने खरेदी केल्यानंतर या ग्रुपवर अदानी ग्रुपने ताबा मिळविला आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्यानंतर रविश कुमार हे देखील चॅनेल सोडणार अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर बुधवारी रविश कुमार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रणय रॉय, राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच अदानी ग्रुपने अदानी समुहाचे सीईओ सुदीप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिनैय्या यांची व्यवस्थापकीय मंडळात नियुक्ती केली आहे.

मंगळवारी आरआरपीआर ग्रुपने अदानी ग्रुपच्या व्हिपीसीएल ग्रुपला 99.9 टक्के शेअर्स ट्रान्सफर केले, त्यानंतर अदानी ग्रुपला एनडीटीव्हीमध्ये 29.5 टक्के हिस्सा मिळाला होता. याशिवाय अदानी ग्रुप 26 टक्के हिस्सेदारीसाठी खुली ऑफर दिली आहे. त्यानुसार कंपनीने एनडीटीव्हीचे एक कोटी 67 लाख शेअर्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या खुल्या ऑफरची अंतिम तारीख 5 डिसेंबर आहे. या ऑफरसाठी अदानी ग्रुपने 294 रुपये प्रति शेअर किंमत लावली आहे.
हे सुद्धा वाचा
ज्येष्ठ मराठी साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
VIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात
आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा

रॉय दाम्पत्याने सन 2009 मध्ये रिलाईंस उद्योगसमुहाशी जोडलेल्या कंपनी विश्वप्रधान कमर्शियल प्राइवेट लिमिटेड (व्हीपीसीएल) कंपनीकडून 400 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या बदल्यात व्हीपीसीएल ला रॉय यांच्या आरआरपीआरचेशेअर्स बदलण्याचा अधिकार होता. आरआरपीआरकडे एनडीटीव्हीचे 29.5 टक्के शेअर्स आहेत. अदानी समुहाने ऑगस्ट महिन्यात व्हीसीपीएल कंपनी खरेदी केली होती. आणि त्यांनी आरआरपीआर चे वॉरंट शेअर्समध्ये बदलण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. सुरूवातीला एनडीटीव्ही समुहाने त्याला विरोध केला, मात्र काही दिवसांपूर्वी एनडीटीव्ही समुहाने त्याला मान्यता दिली. त्यानंतर आरआरपीआरचे 99.5 टक्के शेअर्स व्हीसीपीएल कंपनीकडे आले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी