30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयसीमा हैदरने दिली गोड बातमी, 'कुणी तरी येणार येणार गं...'

सीमा हैदरने दिली गोड बातमी, ‘कुणी तरी येणार येणार गं…’

पाकिस्तानची सीमा हैदर आणि तिचा पती सचिन याने २०२३ हे वर्ष गाजवलं आहे. पाकिस्तानातून चार मुलांसह सीमा हैदर सचिनसाठी भारतात आली. याआधी सीमा हैदरच्या प्रेमावर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. प्रसारमाध्यमांनी सचिनच्या घराबाहेर गर्दी केली होती. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे सचिन आणि सीमाची परिस्थिती झाली होती. एका पब्जी गेममुळे त्यांची ऑनलाईन ओळख झाली त्यावेळी त्यांच्यामध्ये बातचीत अधिक वाढल्याने दोघांच्या नातेसंबंधातील चर्चांना अधिक उधाण आलं. २०२३ वर्ष गाजवल्यानंतर २०२४ च्या पहिल्याच दिवशी ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं एका माध्यमांशी बोलत असताना मुलाखतीत गुड न्यूज देणार असल्याची माहिती दिली आहे.

पाकिस्तान देशातून नेपाळ मार्गे भारतात सीमा आपल्या प्रेमासाठी आली. २०२३ मध्ये ती वर्षभर चर्चेत राहिली होती. वर्ष होतंय नं होतंय तोवर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीमाने वृत्तमाध्यमांना गोड बातमी देणार असल्याचं सांगितलं आहे. सीमा ही सध्या आपला पती सचिनसोबत ग्रेटर नोएडा येथे राहते. माध्यमांना गोड बातमी देणार असल्याचं सांगितलं. ती यंदा आई होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच २०२४ मध्ये सचिनचादेखील वाढदिवस आहे. यामुळे ती आनंदीत आहे.

हे ही वाचा

महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘जगावेगळे’ वाचनालय चालविणारा समाजसेवक

ट्रक चालकांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर, पेट्रोल पंपाबाहेर वाहनचालकांची तोबा गर्दी

अब्दुल सत्तार यांच्यावर ईडीची तक्रार होईना, ईडी कार्यालयाबाहेर केक कापत तक्रारदराने केला निषेध

सचिन आणि सीमा कसे भेटले?

पब्जीमुळे अनेक तरूणांनी मैत्री करून विवाह केला आहे. यामध्ये सर्विधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे सीमा आणि सचिन आहे. सचिन आणि सीमा पब्जी खेळत असताना अनेकदा ऑनलाईन बोलायचे. यावेळी त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले असून त्यानंतर त्याचे रूपांतर नवरा-बायकोच्या नात्यामध्ये झाले आहे. आता मात्र तर ते दोघंही आई बाबा होणार असल्याची माहिती स्वत: सीमाने दिली आहे.

सीमा आता हिंदुरीवाजांना अधिक महत्त्व देत असून ती सर्व सणोत्सव साजरे करत आहे. १५ ऑगस्ट दिवशी हातामध्ये तिरंगा झेंडा घेत व्हिडिओ तयार केला असून राखी पौर्णिमेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्षाबंधन दिवशी राखी पाठवली होती.

मुलांचे उज्ज्वल भविष्य भारतातच

सीमा हैदर म्हणाली की मुलांच्या आगामी उज्ज्वल भविष्य भारतातच आहे. तिला पती म्हणून सचिन योग्य असल्याचं ती म्हणाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी