24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीयराजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चांना उधाण

राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट, चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणूक आता अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे आता प्रत्येक पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. मात्र जागावाटपावरून आणखी कोणाचेच काही ठाम मत नाही. अनेकदा एकाच मतदारसंघावर एकाच युतीतील तीन-तीन उमेदवार दावा सांगत आहेत. यामुळे युतीमध्येच ताळमेळ नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. अशातच आता महाविकास आघाडीच्या जागावाटप अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबल्या आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांना प्रत्येकी १-१ जागा देणार असल्याच्या चर्चा आहेत.

राजू शेट्टी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जवळ आर्धा ते पाऊण तास भेट झाली आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले या मतदारसंघातून आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. मात्र त्यांनी ती जागा महाविकास आघाडीकडून लढवावी असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. खासकरून ठाकरे गटाचा सर्वाधिक प्रयत्न आहे. त्यावरून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा

सीमा हैदरने दिली गोड बातमी, ‘कुणी तरी येणार येणार गं…’

महात्मा गांधींचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘जगावेगळे’ वाचनालय चालविणारा समाजसेवक

ट्रक चालकांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर, पेट्रोल पंपाबाहेर वाहनचालकांची तोबा गर्दी

राजू शेट्टी यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्याचा उद्धव ठाकरे गटाचा आग्रह आहे. कारण शिवसेना फुटण्यापूर्वी हातकणंगले मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. मात्र शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटामध्ये गेले असल्याने आता त्यांच्याविरोधामध्ये राजू शेट्टी यांना ही जागा निवडणुकीसाठी द्यायची आहे अशी इच्छा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आहे. यामुळे आता ठाकरे गटाच्या आग्रहाखातर राजू शेट्टी यांना ही जागा मिळू शकते. मात्र आता राजू शेट्टी यांनी यावर काही भाष्य केलं नाही. जर राजू शेट्टी एकच जागा घेणार असतील तर त्यांना इंडिया आघाडीकडे येण्याचा मार्ग मोकळा असल्याचं म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी