35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईउर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या...

उर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या…

उर्फी जावेदने (Urfi Javed) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फीच्या हातात बेड्या घातलेल्या आहेत. मात्र या बेड्या (handcuffed) पोलिसांनी घातलेल्या नसून तीने एक फोटोशुट केले आहे. हा व्हिडीओ तीने सोशल मीडियावर (social media) पोस्ट करुन एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. तीने म्हटले आहे की, तुम्हाला मला बेड्या घातलेल्या पहायचे होते ना ? तुमची इच्छा पूर्ण केली असे देखील तीने म्हटले आहे. (Urfi Javed posted a handcuffed video on social media)

उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन भाजप (bjp) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार टीका केल्यानंतर उर्फी यावेद आणि चित्रा वाघ यांच्यात वाद पेटला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे देखील तिच्या अंगप्रदर्शनाबाबत तक्रार केली आहे. तसेच तीला अटक करण्याची मागणी देखील केली होती. तर दुसरीकडे उर्फी जावेदने देखील चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद सध्या जोरात पेटला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

चित्रा वाघ यांनी उर्फीच्या सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शनाबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे (Commissioner of Police, Mumbai) देखील तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women)उर्फी जावेदच्या सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शनाबाबत दखल न घेतल्याने गुरूवारी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर देखील शरसंधान साधले होते.

हे सुद्धा वाचा

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत, उत्तानपणे नंगटपणा; चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या!

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

दरम्यान उर्फी जावेद हीने देखील चित्रा वाघ यांच्या टीकेला दरवेळी प्रत्युत्तर दिले होते. याआधी चित्रा वाघ यांच्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत या त्याच महिला आहेत, ज्या संजय राठोडबाबत आरडाओरडा करत होत्या. आता मी देखील भाजपमध्ये जाणार, मग आपणही चांगले मीत्र होऊ, असा टोला चित्रा वाघ यांना लगावतानाच तीने पुढे म्हटले होते की, राजकारण्यांच्या विरोधात लिहीणे धोकादायक आहे, असे लोक मला आत्महत्या करण्यास भाग पाडतील तर मग मी आत्महत्या करावी कि माझे म्हणणे मांडून मरावे काय फरक पडतो.. पण हे सगळे मी सुरू केलेले नाही, मी कधीही कोणाचे वाईट केलेले नाही… हेच लोक माझ्या विनाकारण माझ्या वाटेला येतात असे देखील तीने म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी