31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयअमरनाथ यात्रेत दोन जणांचा मृत्यू

अमरनाथ यात्रेत दोन जणांचा मृत्यू

टीम लय भारी

पहलगाम: पावसामुळे अमरनाथ यात्रेमध्ये बाधा येत आहे. मुसळधार पावसामुळे काल यात्रा थांबवण्यात आली होती. या यात्रेमधील दोन यात्रेकरुचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाला हार्टअटॅक आला तर एक जण घोडयावरुन पडून मृत्यूमुखी पडला.

अमरनाथांच्या पवित्र गुहेत जाण्यासाठी 30 तास उंच पहाड चढावा लागतो. त्यावेळी अनेक जण घोडयावरुन प्रवास करतात. उंचावर आॅक्सिजन कमी असते. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. ठरावी उंची गाठल्यानंतर वातावरणात पूर्ण बदल जाणवू लागतो. त्यामुळे थकवा येतो. श्वसनाचा त्रास होतो. ऊन,पाऊस,बर्फवृष्टीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक वेळा भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.

सकाळी 6 वाजता आरती झाल्यानंतर अमरनाथांचे दर्शन घेण्यास सुरुवात होते. यावर्षी आमरनाथ यात्रेमध्ये 140 हून अधिक लंगर लागले आहेत. त्यामध्ये दिल्ली, पंजाब, राजस्थानचा समावेश आहे. 15 वर्षांपासून 75 वर्षापर्यंतचे यात्रेकरुन सहभागी झाले आहेत.वाटेमध्ये शेषनाथ तलाव आहे. तो अतिषय सुंदर आहे. हा तलाव आकाशाप्रमाणे निळा आहे. शेषनाग अमरनाथ यात्रा सगळयात सुंदर आहे. मात्र तितकीच कठीण आहे.

हे सुध्दा वाचा:

राज्याला ‘संवेदनशील‘ मुख्यमंत्री लाभला – प्रवीण दरेकर

अरेरे…! पंडीत नेहरूंनी एके काळी स्वतःचे घर पक्ष कार्यालयासाठी दिले, त्याच कार्यालयाचे वीज भरण्यासाठी पक्षासाठी पैसे नाहीत!

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी