30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयराज्याला ‘संवेदनशील‘ मुख्यमंत्री लाभला - प्रवीण दरेकर

राज्याला ‘संवेदनशील‘ मुख्यमंत्री लाभला – प्रवीण दरेकर

टीम लय भारी

मुंबई: आज भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी कोकण दौरा केला. त्यांनी रायगड जिल्हयाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूस करुन दिलासा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी देखील फोन वरुन विचारपूस केली. नवीन सरकार हे संवेदनशिल सरकार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही संवेदनशिल आहेत.

कागदावर काम करण्यापेक्षा थेट काम करण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दिला आहे. फाईल अनेक दिवस तशाच पडून राहतात. त्यामुळे काल देखील त्यांनी सकाळी 7 वाजण्यापूर्वीच थेट जिल्हाधिकारींना फोन केला. आमचे सरकार आले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना सांगितले.

रायगड जिल्हयातील पोलादपूर तालुक्यातील ‘चळई ‘येथे दरड कोसळण्याची शक्यता होती. तिथल्या नागरिकांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. या भागात दरड कोसळण्याची माहिती महाविकास आघाडी सरकारला होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यांकडे दुर्लक्ष केले असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. पुर्नवसनाचा विषय प्रलंबीत ठेवला. शिंदे फडणवीस सरकार हे कोकणातील पुरग्रस्तांचे विषय तसे दरडींचे विषय मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागच्या वर्षी तौक्ते वादळाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी कोकण दौरा केला. त्यामुळे तिथल्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, हे त्यांना माहित आहे. या वर्षी मुंबईतील हिंदमाता परिसरात मागच्या वर्षी इतके पाणी साचले नाही. त्यामुळे काम झाले असे सांगून पालिका स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मुंबईत 25 ते 30 ठिकाणी खूप पाणी साचले होते.

हे सुध्दा वाचा:

अरेरे…! पंडीत नेहरूंनी एके काळी स्वतःचे घर पक्ष कार्यालयासाठी दिले, त्याच कार्यालयाचे वीज भरण्यासाठी पक्षासाठी पैसे नाहीत!

फडणवीस-शिंदे भेटीचे गुपित मिसेस फडणवीसांनी केले उघड

बंडखोर सेना आमदाराला मुंबईत आल्यानंतर चार दिवसांनंतर दिसला मतदारसंघ!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी