36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन देशमुख म्हणाले, गुजरात पोलिसांनी मला हात - पाय धरून गाडीत कोंबले,...

नितीन देशमुख म्हणाले, गुजरात पोलिसांनी मला हात – पाय धरून गाडीत कोंबले, एकनाथ शिंदेंनी फसविले

टीम लय भारी

अकोला : शिवसेनेचे पळपुटे नेते एकनाथ शिंदे यांच्या टोळक्यातून आमदार नितीन देशमुख परतले आहेत. त्यांना कसे फसविण्यात आले, याबाबत स्वतः देशमुख यांनी मीडियाला माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आमचे गटनेते होते. त्यांनी ‘चला’ असे सांगितले म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. पण गाडी महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर मला त्यांची लक्षणे ठिक वाटली नाहीत. मी परत यायचा प्रयत्न करीत होतो.

मी रात्री तीन वाजता हॉटेलच्या बाहेर पडलो. फोनवरून, WhatsApp वरून महाराष्ट्रात संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होतो. नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यात अडथळे येत होते. गुजरात पोलिसांनी माझे लोकेशन शोधले. माझ्या मागे १५० – २०० पोलिसांची फौज लागली. अतिरेक्याच्या मागे लागतात तशी ही मंडळी माझ्या मागे लागली.

मला नेण्यासाठी महाराष्ट्रातून एक गाडी येत होती. पण त्या अगोदरच गुजरात पोलिसांनी मला पकडले. अतिरेकी, चोरट्याप्रमाणे सगळ्या पोलिसांनी माझे हात – पाय पकडून गाडीत कोंबले. मला हॉटेलमध्ये नेण्याऐवजी त्यांनी रूग्णालयात जबरदस्तीने नेले.

तिथल्या डॉक्टरांना मी सांगत होतो. मला काहीही झाले नाही. माझी तब्येत चांगली आहे. माझ्यावर उपचार करू नका. त्यानंतर डॉक्टर, कंपाऊंडर अशा २० – २५ जणांनी माझे हात – पाय धरले. मला जबरदस्तीने इंजेक्शन दिले. त्यानंतर मला गुंगी येऊ लागली. झोप सुद्धा लागली.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या सर्व आमदारांना माझे आवाहन आहे. तुम्हाला मतदारांनी, शिवसैनिकांनी व पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा लोकांनी निवडून दिलेले आहे. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या भावना लक्षात घ्या. त्यानंतरच पुढील निर्णय घ्या, असेही नितीन देशमुख म्हणाले.

शिवसेनेसोबतच राहण्याची माझी मानसिकता झाली, तशी इतर आमदारांचीही मानसिकता होईल, अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदेंनी सांगितले, नितीन देशमुखांना पळविल्याचे कारण

खळबळजनक : आमदार नितीन देशमुखांना जबरदस्तीने रूग्णालयात कोंबले, सक्तीने इंजेक्शन दिले

उद्धव ठाकरे यांना ‘कोरोना’ची लागण, विधानसभा भंग करणार नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी