33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे मंत्रिपदापासून वंचित

पंकजा मुंडे मंत्रिपदापासून वंचित

टीम लय भारी

मुंबई : बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता लवकरच भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण यंदा देखील पंकजा मुंडे यांना यामधून डावलण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

ज्या-ज्या वेळी पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले, तेव्हा त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात आले. २०१९ मध्ये पंकजा मुंडे यांचा त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. विधान परिषदेमध्ये तरी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना असताना तिथूनही पंकजांना डावलण्यात आले. त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते निराश झाले.

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिली गेल्याने औरंगाबाद येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भाजप पक्ष एका लोकनेत्याला संपवू पाहत आहे, भाजपला ओबीसी समाज कधी माफ करणार नाही, असेही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा भाजपची सत्ता येत असल्याने पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता तरी पंकजा मुंडे यांना मंत्री मंडळात जागा देण्यात येईल. अशी आशा पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.

हे सुद्धा वाचा :

Breaking : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोघेच घेणार शपथ

हरि नरके यांच्याकडून एकनाथ शिंदेंना झणझणीत सल्ला

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी