37 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeजागतिक‘तीन‘ वर्षात ‘चार‘ वेळा सरकार कोसळले

‘तीन‘ वर्षात ‘चार‘ वेळा सरकार कोसळले

टीम लय भारी:

सीमारिया: एका स्पेशल बिल पास करुन इस्त्रायल सरकार पुन्हा कोसळले आहे. तीन वर्षात चार वेळा हे सरकार कोसळले असून, लवकरच पाचवी निवडणूक होणार आहे. इस्त्रायलची संसद बरखास्त करण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. अनेक पक्षांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.इस्त्रायलमध्ये 2019 पासून 2022 पर्यंत चार वेळा सरकार पडले. बेनेट सरकारमधील येर लैपिडला काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहत आहेत. ते वनमंत्री होते. बेंजामिन नेतन्याहू सरकार पुन्हा यावे अशी अनेकांचीइच्छा आहे.

बेनेट यांना नेत्यन्याहू इतका सरकार चालवण्याचा अनुभव नाही. इस्त्रायलला गंभीर परिणामांची धमकी मिळली आहे. नेमके त्याचवेळी सरकार कोसळले आहे. इस्त्रायलची सुरक्षाव्यवस्था धोक्यात आली आहे. इस्त्रायलच्या मीडिया रिपोर्ट नुसार निवडणुका 25 आॅक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यत होवू शकतात. माजी पंतप्रधन बेंजामिन नेत्यन्याहू पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे.

बेनेटच्या पक्षात लिबरल्स आणि अरबपार्टींचा समावेश आहे. बेनेट सरकार हे सर्वांत वाईट सरकार म्हणून प्रसिध्द झाले. हे सर्वांत कमजोर सरकार आहे अशी प्रतिक्रिया नेतन्याहू यांनी केली आहे. बेंजामीन नेतन्याहू समोर खूप समस्या आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराची केस सुरु आहे. मात्र नेतन्याहूंनी आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तसेच आरोप सिध्द होण्यासाठी भक्कम पुरावे देखील विरोधकांकडे नाहीत. नेतन्याहू यांचे लिकुड सरकार पुन्हा निवडणुकीत विजयी होवू शकते, असा विश्वास त्यांच्या पार्टीच्या नेत्यांना वाटतो. इस्त्रायल सरकारमध्ये 120 जागा आहेत. बहूमत सिध्द करण्यासाठी 61 जागांची आवश्यकता आहे.

हे सुध्दा वाचा:

पंकजा मुंडे मंत्रिपदापासून वंचित

नायगराचे सौंदर्य काचेतून पाहता येणार

हरि नरके यांच्याकडून एकनाथ शिंदेंना झणझणीत सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी