29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयरामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला फुकटचा सल्ला !

रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना दिला फुकटचा सल्ला !

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या दणक्यात भाजपचा कोणताही हात नाही. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यामुळे शिवसेनेचे आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आमदार नाराज होते. एकनाथ शिंदे आणि अनेक आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेने केलेल्या युतीवर नाराज होते.

भाजप सोबत शिवसेनेने युती करावी अशी एकनाथ शिंदे आणि अनेक शिवसेना आमदारांची इच्छा होती. मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीचा चुकीचा निर्णय घेतला.त्यातून एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला असून महाविकास आघाडीचे सरकार लवकर कोसळणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असून महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात गेले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :

Exclusive : राष्ट्रवादी काँग्रेसचीही भाजपसोबत जाण्याची तयारी

मध्यावधी निवडणुकांची काॅंग्रेसला भरली ‘धडकी‘ ; राष्ट्रवादी काॅंग्रेसची ‘नो कमेंटस‘

उद्धव ठाकरे यांना ‘कोरोना’ची लागण, विधानसभा भंग करणार नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी