33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयबारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, सदाभाऊंचा शरद पवारांवर निशाणा

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, सदाभाऊंचा शरद पवारांवर निशाणा

टीम लय भारी

सांगली: माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर टीका करत असे म्हटले की, नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे.

त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, यांच्यामध्ये कोणते स्पेअरपार्ट घातले हेही ब्रम्हदेवाला विचारणार आहे. मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असं म्हणतं त्यांनी पवारांना टोमणा मारला आहे. sadabhau Khot criticizes Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर ब्राह्मणविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावारुनही शरद पवारांनी भाष्य केलं होतं. याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपनेते किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हे सुद्धा वाचा: 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

Nationwide Protest Called By Left Parties Against Rising Inflation, Unemployment Begins Today

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी