30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयनरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार

नरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार

टीम लय भारी

मुंबई:- मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय अजूनही टांगणीला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शिवसेनेने पंतप्रधानांकडे वेळही मागितली आहे. त्यामुळे संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ( shiv sena mp to meet pm narendra modi over maratha reservation issue)

शिवसेने नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यानंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर आम्हाला पंतप्रधानांना भेटायचे आहे. पंतप्रधानांची आम्ही वेळ मागत आहोत. वेळ मिळताच पंतप्रधानांना भेटून आमच्या मागण्या त्यांना सांगणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. (A meeting of Shiv Sena MPs was held at the residence of Shiv Sena leader Sanjay Raut today.)

जंगली प्राण्यांची पुजा करणारी ठाणे-पालघरमधील आदिवासी संस्कृती; परदेशी विद्यापीठाकडून होतेय संशोधन

विजय वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर डागली तोफ, ओबीसींबद्दलच्या दुटप्पी भूमिकेचा केला पर्दापाश

शिवसेना खासदारांच्या आज झालेल्या बैठकीतील तपशीलही संजय राऊत यांनी दिला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना 11 मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत, काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या 11 मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

अशोक चव्हाणांची धावपळ, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी दिल्लीत लॉबींग

Ashok Chavan meets Sanjay Raut, other leaders in Delhi over Maratha reservation issue

Sanjay Raut to meet PM regarding Maratha reservation
संजय राऊत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा, मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावे, असे आव्हान त्यांनी दानवेंना दिले. शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असे रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केले होते. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. आम्ही त्यांची शिकवणी लावू, त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर आम्ही तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही, त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे, पण आरक्षण द्या. इथे विषय अभ्यासाचा नाही, भले भले अभ्यास करणारे लोक मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असे राऊत म्हणाले. (sanjay raut attacks raosaheb danve over maratha reservation issue)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी