33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रधर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : शरद पवार

धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : शरद पवार

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशातील राजकारणावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलं की,आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातंय आज मात्र देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे असा थेट आरोपही यांनी केला. sharad pawar criticize Modi government

काल परवा भाजपशासित कर्नाटक राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनानी काढला. शेवटी व्यवसाय करायचा असेल तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुसंख्याक करु शकतो त्याचा व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल, माल चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे.

परंतु हा या जातीचा, हा या धर्माचा म्हणून तिथे मालच घेऊ नका याप्रकारची कटुता निर्माण करायचे काम जर राज्य हातामध्ये असलेले घटक करू लागले, तर देश पुढे कसा जाईल? sharad pawar criticize Modi government

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद ही त्या काळातील नेतृत्वाची पिढी होती. त्यांनी स्वातंत्र्य उभे करण्यासाठी कष्ट केले आणि नंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले असेही शरद पवारांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळतंय असं ही त्यांनी म्हटलं आहे. sharad pawar criticize Modi government

हे सुध्दा वाचा :

 

https://timesofindia.indiatimes.com/india/said-no-to-modi-got-sonia-uddhav-together-sharad-pawar/articleshow/72340613.cms

किरीट सोमय्यांचा धक्कादायक खुलासा; देशमुख-मलिकांनंतर आता नंबर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात अभिनव आंदोलन!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी