25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
Homeराजकीयगणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार घेणार भेट

गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची शरद पवार घेणार भेट

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी (ता.8) सांगोला दौऱ्यावर आहेत. दिवंगत जेष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट पवार घेणार आहेत (Sharad Pawar will visit the family of Ganapatrao Deshmukh).

गणपतराव देशमुख यांचे 30 जुलै रोजी निधन झाले. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे आज शरद पवार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

गणपतराव देशमुख हे खरे बुध्दिस्ट

राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला

तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे 30 जुलै रोजी निधन झाले. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती (Sharad Pawar had tweeted a tribute to Ganapatrao Deshmukh).

गणपतराव देशमुख हे 1978 मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळातही ते मंत्री होते. गणपतराव देशमुख यांच्याशी शरद पवार यांचे अतिश जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे पवार आज त्यांच्या कुटुंबीयांची सांंत्वनपर भेट घेणार आहेत.

Sharad Pawar visit the family Ganapatrao Deshmukh
शरद पवार आणि गणपतराव देशमुख

Video : राजकारणातील भीष्माचार्य हरपला

Karnataka CM Bommai Meets Sharad Pawar To Discuss Water Sharing Between States

गणपतराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तब्बल 11 वेळा प्रतिनिधित्व केले होते. आबासाहेब या नावाने ते परिचित होते. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्रात विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून जाण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर काम केलेले नेते म्हणून त्यांचा लौकीक होता. गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. त्यांनी पहिल्यांदा 1962 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा केवळ दोनदाच पराभव झाला. 1972 आणि 1995 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ते सलग आमदार राहिले. 1972 च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी ते त्यानंतर झालेल्या 1974 च्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते.

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना लागला तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच ‘विरोधीपक्ष नेते’ पद सांभाळले होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. एसटी बसने प्रवास आणि साधी राहणी यामुळे गणपतराव देशमुख लोकप्रिय होते (Ganapatrao Deshmukh had to go to jail).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी