32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवार यांना कोरोनाची लागण

शरद पवार यांना कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे(Sharad Pawar infected with corona).

शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं पवारांनी म्हटलं आहे.

राज्यात काल दिवसभरात करोनाचे ४०,८०५ नवीन रुग्ण आढळले. तर २७,३७७ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातल्या आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या नागरिकांची एकंदर संख्या ७०,६७,९५५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९४.१५ टक्के आहे.

हे सुद्धा वाचा 

शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…

गुजरातच्या एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी : शरद पवार

War of words between Devendra Fadnavis, NCP leaders as Sharad Pawar plans Goa foray

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी