33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयशरद पवार - ठाकरेंमध्ये गुप्तगू; एकनाथ शिंदेंना दिले आव्हान

शरद पवार – ठाकरेंमध्ये गुप्तगू; एकनाथ शिंदेंना दिले आव्हान

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकार’ वाचविण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात गुप्तगू झाली आहे. प्रमुख नेत्यांसोबत बैठकही झाली आहे. ‘तुम्ही मुंबईत येवून विश्वासदर्शक मतदानाला सामोरे जावून दाखवाच’ अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांना बेधडक आव्हान देण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांनी आज एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी गृहमंत्री व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार संजय राऊत व खासदार अनिल देसाई आदी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या चर्चेचा तपशिल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितला.

फुटीर आमदारांना २४ तासांत मुंबईत येण्याची वेळ दिली होती. ती त्यांनी पाळलेली नाही. ही संधी त्यांनी घालविली आहे. त्यामुळे आता लढाई सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीने सांगतो की, ‘महाविकास आघाडी सरकार’ मजबुतीने टिकणार. पाच वर्षे पूर्ण करणार, असा आत्मविश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

फुटीर आमदारांनी चुकीचे पाऊल टाकले आहे. त्यांनी आता विधानसभेच्या सभागृहात मतदानाला सामोरे जावे. ठाकरे सरकारच्या विरोधातील ठराव त्यांनी जिंकून दाखवावाच, असे आव्हान राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे आता कायदेशीर लढाईला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

एकनाथ शिंदेंकडूनही प्रती आव्हान
एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे पत्र शिवसेनेने काल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले होते. त्यानंतर आज आणखी ४ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे नवे पत्र दिले आहे. हे संकट टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुंबई, नवी दिल्ली व गुवाहाटातील ज्येष्ठ वकिलांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेऊन ते राज्यपालांची भेट घेतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईचे घमासान पाहायला मिळेल असे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदेंच्या नुसत्याच बेटकुळ्या, विधानसभेत तोंडावर आपटण्याची शक्यता, शरद पवारांच्या खेळीकडे लक्ष

एकनाथ शिंदेंना परत आणण्यासाठी गेलेला शिवसैनिक म्हणाला, ‘मला बरंच बोलायचं आहे, पण पोलिसांचं लक्ष माझ्यावर आहे.’

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी