28 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयशिंदे - भाजपाकडे राज्यपाल, तर महाविकास आघाडीकडे विधानसभाध्यक्ष !

शिंदे – भाजपाकडे राज्यपाल, तर महाविकास आघाडीकडे विधानसभाध्यक्ष !

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत. ती निःपक्ष असतात. या पदावरील व्यक्तींनी तटस्थपणे काम केले पाहिजे, असे मानले जाते. परंतु या दोन्ही पदावरील विद्यमान व्यक्ती या विशिष्ट राजकीय विचारांच्या आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय पेचप्रसंगात ते पूर्वग्रहदूषितपणानेच निर्णय घेतील, असे चित्र दिसत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तर राज्यपाल पदाची पुरती अब्रू घालवलेली आहे. राजभवन हे भाजपच्या कारस्थानांचे केंद्रबिंदू असल्यासारखे वातावरण आहे. यापूर्वी, थातूरमातूर प्रकरणांमध्येही त्यांनी ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या विरोधात, व भाजपला साजेशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे आताच्या राजकीय पेचप्रसंगात ते एकनाथ शिंदे गट व भाजप यांना सोयीस्कर असेच निर्णय घेतील, असे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे गट व भाजप यांच्याकडून अद्याप राज्यपालांकडे कोणीही गेलेले नाही. परंतु जेव्हा कुणी जाईल तेव्हा ते या शिंदे – भाजप यांच्याच हिताची भूमिका घेतील, असा पूर्वीच्या अनुभवांवरून अंदाज लावता येईल. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आहे. झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडेच त्यांचे झुकते माप राहील असे बोलले जात आहे. किंबहूना, अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्तीला दिलेली मान्यता हे झिरवळ यांनी सत्ताधारी पक्षाला दिलेले झुकते माप असल्याचेच दिसत आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे सत्ताधारी पक्षाला सभागृहात बहुमताची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून कायद्याचा किस काढला जाईल. राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांचे निर्णय पूर्वग्रहदुषित असतील. तसे आरोपही वेगवेगळ्या गटांकडून केले जातील. अशा परिस्थितीत प्रकरण न्यायालयातही जावू शकते.

न्यायालय पुराव्यांच्या आधारे व नि:पक्षपातीपणे निर्णय देत असते. न्यायालयाच्या निकालावर शंका घेऊ नये असेही मानले जाते. परंतु सन २०१४ नंतर न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयांचे जनमाणसांमधूनही आश्चर्य व्यक्त केले गेले आहे. त्यामुळे न्यायालय सुद्धा आपली भूमिका ‘न्याय्य पद्धतीने’ वटवत नाही, असाही आरोप केला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय पेचप्रसंगात कोण बाजी मारणार? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दाखवला आरसा

शिंदे नाही तर मग ‘त्या‘ हाॅटेल मधून कोण बाहेर पडलं ?

तीन दशकांपूर्वीच्या ‘सत्तानाट्या’ची पुनरावृत्ती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी