33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचे तोंड बंद करा, दीपक केसरकरांचे विधान

संजय राऊतांचे तोंड बंद करा, दीपक केसरकरांचे विधान

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदेच्या गटात अनेक मोठे नेते सामील झाले. त्यामध्ये कोकणातले आमदार दीपक केसरकर समावेश आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंचे बंड किती संयुक्तीक आहे. ते कसे योग्य आहे. हे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचे उध्दव ठाकरेंनी तोंड बंद करावे. ते धमक्या देतात. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गुंडांचा समावेश आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे सांगितले.

एकनाथ शिंदे गटाने नव्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट‘ असे ठेवण्याचे ठरवले आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांना 21 जूनला पाठवला. मात्र त्यांच्या या पत्राची दखल उपाध्यक्षांनी घेतली नाही. त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सादर करण्याच्या प्रयत्न देखील केला. तेथेही त्यांना यश आले नाही. एकनाथ शिंदे गट हा अजून शिवसेनेपासून वेगळा झालेला नाही. त्यामुळे नवा गटनेता नेमण्याचा अधिकार पक्षाला नाही, असेही केसरकर यावेळी म्हणाले. आम्ही शिवसेनेच्या विचार धारांशीच जोडलेले आहोत. पक्षातून बाहरे पडण्यासाठी दोन तृतीयांश आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही नवा गट स्थापन करु शकतो.

बंडखोर आमदार हे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या अफवांचे त्यांनी खंडण केले. आम्ही भाजपमध्ये जाणार नाही. आम्ही भारतीय राज्य घटनेचे पालन करतो आहोत. उलट महाविकास आघाडी सरकार लोकशाहीची विटंबना करत असल्याचा आरोप यावेळी दीपक केसरकर यांनी केला. लोकशाहीने आम्हाला दिलेले आधिकार आहेत. तेच आम्ही मागत आहोत. एकाच नावाचे दोन गट संसदेत बसू शकतात. या प्रस्तावर 38 आमदारांनी हस्ताक्षर केले.

या गटांच्या राजकारणात एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. शिवसैनिक आमच्या लोकांच्या मालमत्तेची तोडफोड करत आहेत. आज तानाजी सावंतांच्या साखर कारखान्यावर तोडफोड झाली. ही शिवसेनीची गुंडगिरी आहे. या शिवसैनिकांवर कारवाई करण्यात यावी.

बाळासाहेबांचे नाव न घेता लढून दाखवा. या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या विधानाचा देखील त्यांनी समार घेतला. मी एनसीपीमध्ये होतो. त्यानंतर शिवसेनेमध्ये आलो. तरी देखील निवडून आलो. निवडून येण्यासाठी पक्षाची ताकद लागतेच, परंतु आपली स्वतःची ताकद देखील उपयोगी पडते. आपली स्वतःची ताकद, ओळख, प्रसिध्दीचा आपल्याला निवडून येण्यास उपयोग होतो.

हे सुध्दा वाचा :

शिवसेनेचा मोठा निर्णय; बंडखोरांना बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, त्यांनी बापाचे नावाने मते मागावीत

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘कायदेशीर लढाईत काँग्रेसची भक्कम तयारी’

‘शिवसेना – बाळासाहेब गटा’ला कायदेशीर मान्यता नसल्याने तो अर्थहीन : अशोक चव्हाण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी