33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2022 : 'या' दोन खेळाडूंची आशिया कप खेळण्याची संधी हुकणार

Asia Cup 2022 : ‘या’ दोन खेळाडूंची आशिया कप खेळण्याची संधी हुकणार

बांग्लादेश संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना आशिया कप स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. वेगवान गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmud) आणि यष्टीरक्षक नुरुल हसन सोहन (Nurul Hasan Sohan) अशी दोघांची नावे आहेत.

सगळ्या क्रिकेट प्रेमींना वेध लागलेल्या आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेची परवा म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी सुरूवात होणार आहे. परंतु या स्पर्धेआधीच वेगवेगळी संकटे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले तर आता बांग्लादेश संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना आशिया कप स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. वेगवान गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmud) आणि यष्टीरक्षक नुरुल हसन सोहन (Nurul Hasan Sohan) अशी दोघांची नावे असून दोघांच्या दुखापतीमुळे बांग्लादेश संघापुढे आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बांग्लादेश संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाल्याची माहिती आयसीसीने ट्विट करत दिली आहे. प्रशिक्षणादरम्यान गोलंदाज हसन महमूद याच्या घोट्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील महिनाभर तो खेळू शकणार नाही, तर यष्टीरक्षक नुरुल हसन सोहन याच्या बोटावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याला सुद्धा डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यंदाच्या आशिया चषक 2022 दोघांना सुद्धा खेळता येणार नाही.

हे सुद्धा वाचा…

Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?

Sanjay Raut Business Partner Booked : संजय राऊतांना धक्का, सुजित पाटकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

VIDEO : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीविरोधात काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे आंदोलन

या चषक स्पर्धेत शाकिब अल् हसनच्या नेतृत्त्वाखाली बांग्लादेश मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील सहभागाबद्दल बोलताना शाकिब अल् हसनने सांगितले, ”माझं या स्पर्धेसाठी कोणतही ध्येय नसून आम्हाला टी20 स्पर्धेतील सामन्यांत चांगली कामगिरी करायची आहे. ही आमच्यासाठी आगामी टी20 विश्वचषकाची (T20 World Cup) तयारी आहे.” असे म्हणून त्यांनी यावेळी दमदार खेळी खेळण्याचा मानस व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी