26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाविजयाची 'सप्तपदी' आणि कोहलीच्या रेकॉर्डची आस

विजयाची ‘सप्तपदी’ आणि कोहलीच्या रेकॉर्डची आस

आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा (ICC ONE DAY WORLD CUP) आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज टीम इंडिया विरुद्भ श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. टीम इंडियाने (Team India) या वर्ल्डकपमधील आतापर्यंत सलग सहा सामने जिंकल्याने विजयाची ‘सप्तपदी’ करणार का, याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी विराट कोहली शतकी खेळी करून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करणार, याचीही उत्सुकता क्रिकेटप्रेमी आणि खासकरून सचिन-विराटप्रेमींना लागली आहे. आजच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम (Wankhede Statium) सज्ज असून काल याच स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यामुळे टीम इंडियाचा उत्साह नक्कीच दुणावला असेल. (Latest News in Marathi)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस हे दोघे आमने-सामने आहेत. मुंबईतील वातावरण अगदी स्वच्छ आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता जास्त आहे. टीम इंडियाने या वर्ल्डकपमधील सर्व म्हणजे सहा सामने जिंकून विजयी षटकार मारला आहे. टीम इंडियाचे गुण आता १२ झाले आहेत. त्यामुळे श्रीलंकेला हलवून टीम इंडिया विजयाची ‘सप्तपदी’ साजरी करेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

श्रीलंकेच्या टीमने (Sri Lanka) आतापर्यंतच्या ६ सामन्यांपैकी २ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर चार सामने गमावले आहेत. त्यामुळे गुण अवघे चार आहेत. दुखापतीमुळे श्रीलंकेच्या प्रमुख खेळाडुंची अनुपस्थिती जाणवत आहे. तरीही श्रीलंकेची सलामीची जोडी तगडी आहे. त्यांचा या वर्ल्डकपमध्ये बहारदार खेळ झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या टीमला कमी लेखता येणार नाही. तरीही चार सामने हरल्यामुळे आणि मुंबईच्या वानखेडे स्डेडियमवर सामना असल्यामुळे टीम इंडियाच्या बाजूने विजयाचे पारडे झुकेल, असा अंदाज आहे. दर एक तपापूर्वी महेंद्रसिंह ढोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने याच वानखेडे स्डेडियमवर श्रीलंकेवर मात करून दुसऱ्यांना वर्ल्डकप जिंकला होता, त्याची या निमित्ताने आठवण काढली जात आहे.

एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विश्वविक्रम आहे. तर विराट कोहलीने आतापर्यंत ४८ शतके मारली आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध कोहलीच्या बॅटने विराट धावा काढल्या तर तो सचिनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करू शकेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचे विराट कोहलीच्या शतकी खेळीकडेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात फटाक्यांची आतषबाजी केली जाणार नाही. मुंबईतील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन असा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे यानंतर दिल्लीत होणाऱ्या सामन्यानंतरही आतषबाजीला ब्रेक लावण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयाची ही बातमी खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी X वर रिपोस्ट केली आहे.

हे ही वाचा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न सुटतात फटाफट

मराठा आरक्षण: सर्वपक्षीयांच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी शरद पवार

आतापर्यंत टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात ९ सामने झाले आहेत. त्यातील दोन्ही टीमने प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत.  तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी