26 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeक्रिकेटमिचेल स्टार्क आयपीएल लिलावात एकच नंबर; पॅट कमिन्सलाही टाकलं मागे

मिचेल स्टार्क आयपीएल लिलावात एकच नंबर; पॅट कमिन्सलाही टाकलं मागे

देशात आगामी आयएपीएल २०२४ (IPL 2024) काही महिन्यातच क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या आयपीएलकडे अनेक क्रिकेट चाहत्याचं लक्ष लागलं आहे. यामुळे ही आयपीएल सुरू होण्याआधीच अधिक चर्चा पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ही आयपीएल सुरू होण्यापूर्वी अनेक वादविवाद पाहायला मिळत आहेत. याच आयपीएल हंगामाचा लिलाव (१९ डिसेंबर) दिवशी दुबई येथे करण्यात आला. यामध्ये पॅट कमिन्सला (Pat cummins) २० कोटी ५० लाख रूपयांना सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. तर पॅट कमिन्सचा रोकॉर्ड मोडित काढत स्टार्क मिचेलला (Mitchell Starc) केकेआरने २४ कोटी ७५ लाख रूपयांना विकत घेतले आहे.

मिचेल स्टार्कला घेण्यासाठी कोलकाता आणि गुजरात टायटन्समध्ये काटे का मुकाबला पाहायला मिळाला. मात्र शाहरूख खानने स्टार्कला घेतलं. दरम्यान बीबीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार सध्याच्या आयपीएल लिलावामध्ये ११६६ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. त्यामध्ये ३३३ नावे ही नोंदवली गेली आहेत. २१४ भारतीय आणि ११९ खेळाडू हे विदेशी खेळाडू असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले २१५ खेळाडू असून दोन खेळाडू हे सहयोगी देशांचे असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा

सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे लोकसभेतून निलंबित

राम मंदिराच्या उद्घाटनाला आडवाणींना न येण्याची विनंती; तर ‘हे’ बॉलिवूड कलाकार लावणार उपस्थिती

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार चैन की निंद; शाळेच्या वेळेत होणार बदल

वेस्टइंडिजच्या अल्झारीची चांदी

आयपीएलच्या १० संघांमध्ये ७७ खेळाडू घेतले जाणार आहेत. दरम्यान आता वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफची मुळ किंमत ही एक कोटी रुपये असणाऱ्या वेगवान गोलंदाजाला ११ कोटी ५० लाख रूपयांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने घेतलं. गेल्या हंगामात अल्झारी हा गुजरात टायटन्समध्ये खेळताना दिसला होता.

बंगळूर आणि चेन्नईमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं

त्याचप्रमाणे पॅट कमिन्सला २० कोटी रूपयांना जरी विकत घेतलं असलं तरीही बंगळूर आणि हैदराबादमध्ये कमिन्सला घेण्यासाठी चुरस रंगली होती. सुरूवातीला मुंबईने पॅट कमिन्सवर ५ कोटी रूपयांची बोली लावण्यात आली होती. त्यानंतर बंगळूर आणि चेन्नईमध्ये लिलावासाठी दोन्ही संघमालकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यामध्ये चेन्नईने १० कोटी बोली लावली. त्यानंतर बंगळूर आणि हैदराबादमध्ये बराच वेळ गेला, मात्र या दोन्ही संघांच्या संघमालकांनी २० कोटी एवढी बोली लावली, त्यानंतर हैदराबादने शेवटच्या क्षणाला २० कोटी ५० लाख रुपयांना कमिन्सला विकत घेतले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी