28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजन'लोकशाही बसली धाब्यावर' अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सरकारला चांगलंच झापलं

‘लोकशाही बसली धाब्यावर’ अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सरकारला चांगलंच झापलं

देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे संसदेमध्ये खासदारांनी उपस्थित केले आहेत. काही दिवसाआधी संसदेमध्ये तरुणांनी गॅलरीमधून हल्ला केला होता. याप्रकरणी संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर विरोधी खासदारांनी सत्ताधाऱ्यांना सुरक्षेच्याबाबतीत प्रश्न केला असता, खासदारांना निलंबित केलं आहे. यामध्ये आतापर्यंत ४९ खासदारांना एकाच दिवशी (१९ डिसेंबर) निलंबित करण्यात आलं. तर आतापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं. यावर आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सरकारला चांगलंच झापलं आहे.

काय म्हणाल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित?

देशात १४९ खासदारांना निलंबित केलं आहे. या खासदारांनी सरकारला सुरक्षेच्या प्रश्नांची उत्तरे मागितली होती. मात्र या खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यावर तेजस्विनी पंडित म्हणाल्या, चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही…! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास? असा सवाल उपस्थित करत आपला संताप व्यक्त केला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर त्यांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ शेअर केला आहे.

'लोकशाही बसली धाब्यावर' अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सरकारला चांगलंच झापलं

राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर बोलत असताना तेजस्विनी पंडित नेहमीच दिसत आहे. त्यांनी याआधी मनसेने टोलनाक्याच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी देखील तेजस्विनी यांनी आपल्या x ट्विटरवर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता खासदारांच्या निलंबनावर सरकारला प्रश्न उपस्थित केला असून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा

सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर शरद पवारांचा संताप

‘आईच्या मुलाला कुणबी जातप्रमाणपत्र द्या’

मिचेल स्टार्क आयपीएल लिलावात एकच नंबर; पॅट कमिन्सलाही टाकलं मागे

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांआधी संसदेमध्ये काही तरूणांनी विशिष्ट प्रकारच्या धुरांच्या नळकांड्या सोडल्या होत्या. संसदेच्या गॅलरीतून ते आतमध्ये आले होते. यामुळे संसदेच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत विरोधी पक्षांच्या खासदारांनी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये झालेल्या धक्कादायक प्रकरणाबाबत सवाल उपस्थित केले आहेत. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया सरकराने न देता, विरोधी खासदारांना निलंबित केलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनाही निलंबित करण्यात आलं.

४९ खासदार निलंबित

१.दुलाल चंद्र गोस्वामी २. रवनीत सिंग बिट्टू ३. दिनेश यादव ४. के सुधाकरन ५. मोहम्मद सादिक ६. एमके. विष्णुप्रसाद ८. पीपी मोहम्मद फैजल ९. सजदा अहमद १०. जसवीर सिंग गिल ११. महाबली सिंग १२. अमोल कोल्हे १३. सुशील कुमार रिंकू १४. सुनील कुमार सिंग १५. एसडी हसन १६. एम. दनुषकुमार १७. प्रतिभा सिंह १८. थोल थिरुमलवन १९. चंद्रेश्वर प्रसाद २०. आलोक कुमार सुमन २१. दिलीश्‍वर कामैत २२. व्ही. वैथिलिंगम २३. गुरजीत सिंग औंजला २४. सुप्रोया सुले २५. एसएस.पलानिमनिकम २६. अदूर प्रकाश २७. अब्दुल समद २८. मनीष तिवारी २९. प्रद्युत बोर्डोलोई ३०. गिरधारी यादव ३१. गीता कोरा ३२. फ्रान्सिस्को सारादिना ३३. एस. जगतरक्षक ३४. एस.आर. पार्थिवन ३५. फारुख अब्दुल्ला ३६. ज्योत्सना महंत ३७. A. गणेशमूर्ती ३८. माला रॉय ३९. पी. वेलुसामी ४०. ए.चेल्लाकुमार ४१. शशी थरूर ४२. कार्ती चिदंबरम ४३. सुदीप बंदोपाध्याय ४४. डिंपल यादव ४५. हसनानीन मसूदी ४६. डॅनिश अली ४७. खलीलुर रहमान ४८. राजीव रंजन सिंह ४९. DNV. सेंथिल कुमार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी