33 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्स संघासोबत सचिन तेंडुलकरचं नातं संपुष्टात?

मुंबई इंडियन्स संघासोबत सचिन तेंडुलकरचं नातं संपुष्टात?

आयपीएल २०२४ (IPL 2024) पर्व काही महिन्यातच सुरू होईल. मात्र या पर्वाआधी अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आता कर्णधारपदावरून पायउतार होताच. मुंबई नाही तर देशभरातून आणि जगभरातील रोहित शर्माचे चाहते नाराज आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार हार्दिक पांड्याने संघचालकांना कर्णधारपदाची मागणी केली होती आणि त्या कर्णधारपदाची मागणी संघचालकांनी मान्य केल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे रोहित शर्माचे चाहते खूपच नाराज तर काही संघचालकांवर संतापले आहेत. यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडिया अकाउंटला अनेक चाहत्यांनी अनफॉलो केलं असल्याची माहिती समोर येत आहे. यामुद्द्याला धरून सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघासोबतचं नातं तोडलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आलं आहे. यामुळे आगामी आयपीएल २०२४ पर्व अधिकाधीक चर्चेत आलं आहे. रोहितला कर्णधारपदावरून काढण्यात आल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मुंबई इंडियन्स संघाशी असलेले नाते तोडल्याच्या चर्चा सुरू आहेत. सचिनने आपल्या मेंटॉरपदावरून पायउतार झाल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा

‘रश्मिका मंदान्नापेक्षा माझी आजी पाणी कम चाय…’

‘मराठा समाजाला आरक्षण द्या’; जरांगेंसोबत आंदोलनाच्या रिंगणात बच्चू कडू

वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेचा फज्जा; सर्व खुर्च्या रिकाम्याच

मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर संघाला खेळाबद्दल मार्गदर्शन करतो. रोहितला डावलून आता हार्दिक पांड्याला कर्णधारपदाचा दावेदार ठरवल्याने सचिन तेंडुलकरने हा संघ सोडण्याबाबत निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र अजूनही यावर अधिकृत घोषणा झाली नाही. कारण आयपीएलने कोणतीही घोषणा केली नाही. सचिन तेंडुलकरनेही कोणतीच माहिती दिली नाही. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सनेही कोणतीही घोषणा केली नाही.

आयपीएलच्या सुरूवातीपासून सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघासोबत अजूनही जोडला गेला आहे. २००८ ते २०११ पर्यंत त्याने संघाचे नेतृत्व केलं आणि त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडून दिलं. पुढील दोन हंगामात संघासाठी तो फलंदाज म्हणून राहिला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी