27 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'मराठा समाजाला आरक्षण द्या'; जरांगेंसोबत आंदोलनाच्या रिंगणात बच्चू कडू

‘मराठा समाजाला आरक्षण द्या’; जरांगेंसोबत आंदोलनाच्या रिंगणात बच्चू कडू

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वाद सुरू आहेत. सरकारकडे मराठा बांधव आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र सरकारने अजूनही याबाबत कोणतेही पाऊल उचललं नसल्याचं विरोधीपक्षांचं म्हणणं आहे. मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गात मराठा आरक्षण हवं आहे. मात्र आता सरकार कोणतंही ठोस पाऊल उचलायचं नाव घ्यायला मागत नाही. अशातच आता मराठा समाजाला आरक्षण द्या असे अवाहन आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी केलं आहे. जर आरक्षण दिलं नाही तर मी ही जरांगेंसोबत (Manoj Jarange-patil) आंदोलनाला बसणार असल्याचं कडू म्हणाले आहेत. कडूंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर मी ही जरांगेंसोबत आंदोलन करणार आहे. मी जरांगेंना शब्द दिला होता आणि मी शब्दाचा पक्का आहे. मराठा आक्षणासाठी शिंदे समिती स्थापन केली होती. त्या समितीने काय केलं? जालन्यात मराठा बांधवांवर लाठीचार्ज करत गुन्हे दाखल केले आहेत. २४ डिसेंबर तारिख जवळ येत आहे. येत्या १७ तारखेला पुन्हा एकदा जरांगे आंदोलनास सुरूवात करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

हे ही वाचा

वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेचा फज्जा; सर्व खुर्च्या रिकाम्याच

मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध – देवेंद्र फडणवीस

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं – बच्चू कडू

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं बच्चू कडूंचं देखील म्हणणं आहे. जरांगेंना मराठा आरक्षणाबाबत कडूंचा पाठिंबा आहे. ओबीसींना भेटलेलं आरक्षण हे कमीच आहे. ओबीसींचं ५२ टक्क्यांपर्यंत आरक्षण जावं आणि त्यात ओबीसींनी आरक्षण वाढवून घेऊन तसेच अ,ब,क,ड असे विभाग करा. यानंतर ते म्हणाले, मराठा ओबीसी नाहीत का? मराठा कोण आहे? मराठा पाकिस्तानचा आहे? मराठा अमेरिकेचा आहे? त्यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? असा सवाल आता बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे.

ओबीसी नेत्यांनी काय केलं? 

मराठा आरक्षणावर बोलत असताना बच्चू कडूंनी ओबीसी नेत्यांवरही टीकेची तोफ डागली आहे. ओबीसी नेते गेली ७० वर्षे सत्तेत आहेत. त्यांनी ओबीसी समाजासाठी काय केलं? असा सवाल आता बच्चू कडूंनी विचारला आहे. गेली ७५ वर्षांपासून जर शेतीचे प्रश्न मिटले असते, शेतीमध्ये मजुराला चांगली मजुरी मिळाली असती, असे झालं असतं तर आरक्षणाची वेळ आली नसती. हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी