33 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeराजकीयवर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेचा फज्जा; सर्व खुर्च्या रिकाम्याच

वर्ध्यातील ओबीसी एल्गार सभेचा फज्जा; सर्व खुर्च्या रिकाम्याच

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभर दौरे करत आहेत. यास प्रत्युत्तर म्हणून आता ओबीसी नेते छगन भुजबळ ओबीसी एल्गार महासभा राज्यभरात घेत आहेत. राज्यामध्ये काही ठिकाणी ही सभा झाली असून शनिवारी वर्धा येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेला आपेक्षेपेक्षा खूपच कमी गर्दी असल्याने ओबीसी नेत्यांची फजिती झाल्याची चर्चा आहे. ओबीसी एल्गार सभेच्या काही सभा पाहिल्या मात्र आजच्या वर्ध्यातील सभेमध्ये काहीक ओबीसी बांधव खुर्च्यांवर दिसत होती. इतर सर्व खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. या सभेवर काय प्रतिक्रिया येतील याकडे आता जनतेचं लक्ष लागलं आहे.

वर्ध्यातील सभा ही सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. मात्र ही सभा दुपारी १ वाजता सुरू झाली. या सभेत काही नेत्यांनी भाषणं केली होती. तर या सभेतच काही ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्याने ओबीसी एल्गार सभेत मोजकेच ओबीसी बांधव आल्याचे दिसून आलं आहे. भुजबळांचं भाषण एकणार तरी कोण? असा सवाल आता उपस्थित होत होता. कारण समोरील खुर्च्यांवर ओबीसी बांधव नसल्याने ओबीसी बांधवांनी एल्गार सभेकडे पाठ फिरवली का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

हे ही वाचा

मराठा आरक्षणाला शरद पवारांचा विरोध – देवेंद्र फडणवीस

डॉ. प्रशांत इंगळे बसपाचे मुंबई कोकण झोन प्रभारीपदी नियुक्त

रोहित शर्माचे कर्णधारपद काढून घेताच चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात

विजय वडेट्टवार यांची अनुपस्थिती

ओबीसी एल्गार महासभा सर्वात प्रथम जालना येथे झाली होती. त्या सभेला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर भुजबळांनी इतर काही भाषणांमध्ये समाजात तेढ निर्माण होत असल्याचा दावा विरोधकांनी केला असता, वडेट्टीवार यांनी एल्गार सभेला जायचं टाळलं आहे. वर्ध्यातील सभेतही ते गेले नव्हते.

१० टक्के गर्दी

मराठा समाज गेली काही दिवसांपासून ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मागत आहे. मात्र ओबीसी समाज या मागणीच्या विरोधात असल्याने त्याचा निषेध करत ओबीसी एल्गार महासभा भरवत आहेत. शनिवारी ही महासभा वर्ध्यातील आरटीओच्या मैदानात भरवण्यात आली होती. २५ हजार लोकांची गर्दी होईल अशा अपेक्षा होत्या, मात्र या ठिकाणी १० टक्के गर्दी दिसून आल्याने इतरही खुर्च्या रिकाम्या होत्या. ओबीसी बांधवांनी सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी