22 C
Mumbai
Sunday, February 25, 2024
Homeराजकीयधारावी मोर्च्यावर राज ठाकरे कडाडले; कंत्राट काढून १० महिने झाले अन् मोर्चा...

धारावी मोर्च्यावर राज ठाकरे कडाडले; कंत्राट काढून १० महिने झाले अन् मोर्चा आज का?

आगामी निवडणुकांचा वेध घेता राज्यातील राजकारणात आगामीकाळात वेगळे ट्विस्ट घडणार असल्याची माहिती समोर येत आहेत. काही दिवसांपासून धारावी झोपडपट्टीचा विकास उद्योगपती अदानी करणार आहेत. मात्र धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी अदानीच का? असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. यावर अनेकदा राजकीय नेते राज्यातील अनेक कंपन्या तसेच इतर उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात असल्याचं बोलत आहेत. अशातच आता धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी अदानींना कंत्राट दिलं असल्याने याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने काही दिवसांआधी मोर्चा काढला होता. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानींसह उद्धव ठाकरेंना देखील मोर्चा आताच का काढला? असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलत असताना केला आहे.

मुंबईमध्ये अदानीला धारावी हा प्रकल्प विकास कामांसाठी दिला आहे. या विरोधात उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अदानी हटाव, धारावी बचाव अशा घोषणा देत निषेध करत मोर्चा काढला होता. यावर राज ठाकरे यांनी आधी अदानींवर आणि नंतर उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, असं काय आहे की मुंबईतील कंपन्या, कोळसा, विमानतळ, रिडेव्हलपमेंट सगळे मोठे प्रोजेक्ट अदानींकडे आहेत. मुंबईत अनेक कंत्राटदार आहेत त्यांना प्रकल्प द्यावा ना? असा प्रश्न आता राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा

मुंबई इंडियन्स संघासोबत सचिन तेंडुलकरचं नातं संपुष्टात?

‘रश्मिका मंदान्नापेक्षा माझी आजी पाणी कम चाय…’

‘मराठा समाजाला आरक्षण द्या’; जरांगेंसोबत आंदोलनाच्या रिंगणात बच्चू कडू

धारावी मोर्च्यावर सवाल

धारावी विकासासाठी १० महिन्यांपूर्वी कंत्राट पास झालं आहे. मग मोर्चा आज का काढला जातो? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय की आणखी काय? असा सवाल करत आता राज ठाकरेंनी धारावी मोर्च्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. शाळा किती? ओपन स्पेस किती? रिडेव्हलपमेंटसाठी प्लॅन असतो. तो आहे का? असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

देशात मेरी मर्जी सुरू

आगामी महापालिकेच्या निवडणुका या २०२५ ला होतील असं त्यांनी उपहासात्मक सांगितलं. कारण सध्या देशात मेरी मर्जी सुरू आहे असं देखील ते म्हणाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी देखील सुरू आहे. लोकसभेसाठी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या? यावर पक्षामध्ये बैठक झाली असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी