30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeक्रीडासानिया मिर्झाची भावनिक पोस्ट करत टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट करत टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

हैदराबादची एक सहा वर्षांची मुलगी ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा आपल्या आईसोबत टेनिस कोर्टवर गेली होती. त्यावेळी प्रशिक्षकांनी टेनिस कसे खेळायचे हे समजावून सांगितले. मात्र मी खुपच लहान असल्याचे मला त्यावेळी वाटले होते. खरे तर तेव्हाच माझ्या स्वप्नांची लढाई सुरू झाली होती, अशी भावनिक पोस्ट करत भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने शुक्रवारी (दि. १३) प्रोफेशनल टेनिसमधून (tennis) निवृत्तीची (retirement) घोषणा केली. (Sania Mirza announces her retirement from tennis)

यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन ही सानिया मिर्झाची टेनिसमधील अखेरची टुर्नामेंट असेल. सोमवार (दि.१६) रोजीपासून ऑस्ट्रेलियन ग्रॅंडस्लॅम ओपन टूर्नामेंट मेलबर्न येथे सुरू होणार आहे. यापूर्वी सानियाने दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान आज तिने ऑस्ट्रेलियन ग्रॅंडस्लॅम ओपननंतर निवृत्ती घेणार असल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. मुलांना आता अधिक वेळ द्यायचा असून आता आय़ुष्यात थोडी शांतता हवी असल्याचे देखील सानिया मिर्झाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.


हे सुद्धा वाचा

इस्लाम बदलणार की नाही? राखी सावंत धर्म बदलून फातिमा झाल्यानंतर तस्लीमा नसरीन यांचा संतप्त सवाल

‘लय भारी’चे व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात यांना यशवंत रत्न पुरस्कार

मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत कोणाशी बोलायचे हेच मुख्यमंत्र्यांना माहिती नाही; आदित्य ठाकरे यांची टीका

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)


सानिया मिर्झाची कारकिर्द अतिशय यशस्वी राहिली आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये तीने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सानियाने ग्रॅंडस्लॅम ओपन एकेरी टुर्नामेंटमध्ये विजेतेपद पटकाविता आले नसले तरी ग्रँड स्लॅम मिश्र दुहेरीमध्ये तिने अतिषय चमकदार कामगिरी करत सहा वेळा विजेतेपद पटकाविले आहे. २००९ मधील मिश्र दुहेरी ऑस्ट्रेलियन ओपन, २०१२ सालची मिश्र दुहेरी फ्रेंच ओपन, २०१४ सालची मिश्र दुहेरी यूएस ओपन, २०१५ सालची महिला दुहेरी विम्बल्डन, २०१५ सालची महिला दुहेरी युएस ओपन, तसेच २०१५ आणि २०१६ सालची महिला दुहेरी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिने विजेतेपद पटकावत भारताचा नावलौकिक केला होता.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी