25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरमुंबईमुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत कोणाशी बोलायचे हेच मुख्यमंत्र्यांना माहिती नाही; आदित्य ठाकरे यांची...

मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत कोणाशी बोलायचे हेच मुख्यमंत्र्यांना माहिती नाही; आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई महापालिकेची खोके सरकारने लुट केली. सरकारने चारशे किलोमीटर रस्त्यांचे ६ हजार ८० कोटींचे टेंडर काढले. मुंबईत १ ऑक्टोबर ते ३१ मे दरम्यान कामे केली जातात. फेब्रुवारीत जर कामे सुरू केली तर ती पुर्ण कधी होणार. मुंबईत रस्त्यांशी संबंधीत ४२ युटिलिटीज, १६ एजन्सीज, आहेत. रस्त्यांची कामे करताना वाहतुक पोलिसांशी देखील बोलावे लागते. मात्र मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) कुणाशी बोलायचे हे देखील माहिती नाही. सरकारने फिल्म सिटीतील रस्त्यांचे टेंडर काढले, जे पालिकेच्या अखत्यारीत नाही, असा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईच्या रस्त्यांसाठी जे टेंडर काढले. त्यात १८ टक्के जीएसटी वेगळा मोजला. त्यामुळे कंत्राटदारांना ४८ टक्क्यांचा फायदा झाला, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Aditya Thackeray criticizes Eknath Shinde over road works in Mumbai)

मुंबईतील रस्ते दोन वर्षांत काँक्रिटचे करायचे असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी या पुर्वी ते ठाण्यात का केले नाही, असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. रस्ते कामांच्या कंत्राटात ४० टक्केहून अधिक फायदा कंत्राटदारांचा झाला, असा आरोप करतानाच, मुंबईची लुट थांबविण्यासाठी आम्ही पाऊल उचलणार आहोत, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर पैशांची उधळण करायची हे धोरण सरकारने ठेवले आहे. २५ वर्षात आम्ही पैशांची बचत केली, देशाचे लक्ष मुंबईने वेधले, असे देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रामचरितमानस ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरविणारी रचना; बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा माफी मागण्यास नकार

What An Idea : 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर

‘स्वराज्य कनिका-जिऊ’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ईश्वरी देशपांडे जिजाऊ माँ साहेबांच्या भूमिकेत

गेल्या सहा महिन्यात मोगलाई आली आहे, अशी स्थिती आहे. गणपती उत्सवात गोळीबार झाला, त्यानंतर धक्काबुक्की, दमदाटी असे अनेक प्रकार गद्दार आमदारांनी केले आहेत. मात्र कारवाई झाली नाही. शिवरायांचा, म. फुलेंचा अपमान करुन ही राज्यपालांवर कारवाई झाली नाही, खोके सरकार त्यांना वाचवत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी