28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रऊसतोड कामगारांच्या लेकरांची वसतिगृहे तात्काळ सुरु करा - धनंजय मुंडे

ऊसतोड कामगारांच्या लेकरांची वसतिगृहे तात्काळ सुरु करा – धनंजय मुंडे

टीम लय भारी

मुंबई: माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे तयार केली. ती 20 वसतीगृहे सुरु करावीत अशी मागणी धनंयज मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राव्दारे केली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत 2021 मध्ये संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह सुरु करण्यात आली आहेत.

ऊसतोडणी हंगाम संपला आहे. त्यामुळे कामगार आपल्या गावी आले आहेत. त्यामुळे आता त्यांना शाळेत पाठवणे आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरु करण्यात आली होती. असेही धनंजय मुंडेनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या 20 वसतीगृहांना मंजूरी दिली आहे. तसेच भाडयाच्या जागेत सदर वसतिगृहे उभारण्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला होता.

त्यानुसार इमारत अधिग्रहण व अन्य प्रक्रिया देखील समाज कल्याण विभागाने पूर्ण केली आहे.बीड जिल्हयात मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 100 क्षमता असलेले 12 तर अहमदनगर व जालना जिल्हयासाठी प्रत्येकी 4 अशी एकूण 20 वसतिगृहे मंजूर करण्यात आली आहेत.

हे सुध्दा वाचा:

राजीनामा सत्राने शिवसेना हादरली

विवेक प्रकाशनचे आगामी पुस्तक ‘अखंड भारत का आणि कसा‘?

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी