29 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरराजकीयTata Airbus Project : महाराष्ट्राच्या हातातून २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प...

Tata Airbus Project : महाराष्ट्राच्या हातातून २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प निसटला!

टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटला आहे. आता हा प्रक्लप गुजरामध्ये होणार आहे. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी केला आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटला आहे. आता हा प्रक्लप गुजरामध्ये होणार आहे. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी केला आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जो प्रकल्प एक वर्षापूर्वी गुजरातला गेला. त्यावर आज टीका करण हे एका अर्थाने अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे असा पलटवार उपाध्ये यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी मोठे प्रयत्न करत होते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील हा प्रकल्प नागपूरात येणार असल्याचे सुतोवाच केले होते. मात्र हा प्रकल्प आता प्रकल्प गुजरातला गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295एमडब्लू वाहतूक विमान खरेदी करण्यास मान्यता दिली होती. संरक्षण मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2021 रोजी, मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. सोबत संबंधित उपकरणांसह विमान संपादन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.

 हे सुद्धा वाचा :

indian currency : चलनी नोटा आणि गांधींचा फोटो याबद्दलचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

मोदी आणि केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात; नाना पटोले यांचा हल्लाबोल

Nagpur Airport : VIP कल्चर बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांचा असाही साधेपणा!

 नवी दिल्ली येथे 27 ऑक्टोबर 2022 रोजी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले की, करारा अंतर्गत, 16 विमाने उड्डाणासाठी सज्ज अशा स्थितीत वितरित केली जातील आणि 40 विमाने भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टीएएसएलच्या नेतृत्वाखाली भारतात तयार करेल. लष्करी विमानाची निर्मिती खासगी कंपनीद्वारे केली जाणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो. उड्डाणासाठी सज्ज अशी पहिली 16 विमाने सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान मिळणार आहेत. पहिले स्वदेशी अर्थात मेड इन इंडिया विमान सप्टेंबर 2026 पासून उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!