36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार; सोमय्यांचा पुन्हा इशारा

उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार; सोमय्यांचा पुन्हा इशारा

एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका देण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भागीदाराचा ५०० कोटी रुपयांचा आणखी एक “५ स्टार” घोटाळा लवकरच उघड करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. त्यासंदर्भात शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश करणार असल्याचे ‘ट्विट’ त्यांनी केले आहे. त्यामुळे सोमय्या आता कोणावर शरसंधान करणार याबाबत राजकीय गोटात उत्सुकता निर्माण झाली आहे. (500 crore scam of Uddhav Thackeray’s partner will be exposed)

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे सर्व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार असल्याचा निर्धार केला असल्याचे म्हंटले होते. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा लक्ष्य केले असून त्यांच्या पार्टनरचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी १ मार्च रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका देण्यात आल्याचा तसेच बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली त्या कंपनीला मुलाने ठेका दिला, असा आरोप त्यांनी केला होता. आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला असून पुण्यात ‘पीएमआरडीए’ने बंदी घातलेल्या या कंपनीला वरळीतील ‘आयसीयू’चा ठेका दिल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी त्यांनी आता नंबर कोणाचा सुजित पाटकर की संजय राऊत? असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्याकडे संशयाची सुई जात असल्याचे सोमय्या यांनी सूचित केले आहे.

हे सुद्धा वाचा

IAS Transfer : आयएएस डॉ. निधी पांडे यांची अमरावती विभागीय आयुक्तपदी बदली

मी कुटुंबाचाच नाही, तर महाराष्ट्राचा विचार करतो; शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

Vedio : येऊरच्या जंगलात २४ तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याचा बिहार झालाय!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी