28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरे यांनी जगविख्यात अजिंठा लेण्यांना दिली भेट, पर्यटनवाढीसाठी महत्वाचे पाऊल

आदित्य ठाकरे यांनी जगविख्यात अजिंठा लेण्यांना दिली भेट, पर्यटनवाढीसाठी महत्वाचे पाऊल

टीम लय भारी
औरंगाबादः-  महाराष्ट्र राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमधील अजिंठा व्ह्यू पॉईंट, पर्यटक केंद्र आणि अजिंठा लेण्यांची प्रत्यक्ष पाहणी  केली.(Aditya Thackeray visits world famous Ajanta)

तसेच अजिंठा लेणी परिसराची निसर्गसंपन्नता, वैभव पाहून त्यांनी या ठिकाणी मोबाईलने छायाचित्रेही त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली. त्याचबरोबर लेणीतील बारकावे, इतिहास समजून घेतला.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांचा आरोप, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास ‘धर्मवीर’ चित्रपटातून येणार समोर

मुंबई उपनगर जिल्ह्यात विकासाची कामे सुरु : आदित्य ठाकरे

Mumbai to get iconic double-decker bus in electric avatar: Aditya Thackeray

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अजिंठा लेणी परिसरातील लेणी क्रमांक १, २, ४, ९, १०, १९ आणि २६ यांची प्रत्यक्ष पाहणी करून या लेणी वैभवाची महती प्रत्यक्ष जाणून घेतली. राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी लेणी परिसरातून वाहणाऱ्या वाघूर नदीचे खाम नदीच्या धर्तीवरच पुनर्जीवन व्हावे, वृक्ष लागवडीसाठी इको बटालियनची मदत घेऊन वृक्ष लागवड, संवर्धन आणि संगोपन व्हावे, अशी अपेक्षा मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पुरातत्व विभागाचे अधीक्षक मिलन कुमार चावले, पर्यटन संचालनालयाचे उप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, औरंगाबाद विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, विजय जाधव उपस्थिती होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी