30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयकाश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? अमित शहांचा कॉंग्रेसला सवाल

काश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? अमित शहांचा कॉंग्रेसला सवाल

जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निर्णय दिला. काही दिवस सुनावणी सुरू असताना ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत निर्णय रोखून ठेवला. लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करून जम्मू आणि काश्मीरमध्ये३० स्पटेंबर २०२४ पर्यंत निवडणूक घ्याव्यात. दरम्यान भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पंडित नेहरू आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानविरोधात युद्धजन्य परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर त्यावेळी पाकिस्तानविरोधात युद्धविराम झाला नसता तर पिओकेची घटना घडली नसल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले अमित शहा?

अमित शहांनी ३७० कलम हटवण्याबाबत बोलत असताना काँग्रेस आणि नेहरूंवर निशाणा साधला आहे. शहा म्हणाले की, काश्मीर पेक्षा मोठी समस्या हैद्राबाद येथे होती. नेहरू त्या ठिकाणी गेले नाहीत. लक्षद्वीप, जुनागड, जोधपूर येथे नेहरू गेले नाहीत, असे अमित शहा म्हणाले आहेत. नेहरूंनी काश्मीरचे काम पाहिले आणि तेही अर्धवट सोडले. काश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? असा प्रश्न उपस्थित करत शहांनी १००० वर्षाखाली गाडलेला इतिहासाचे सत्य बाहेर येतेच म्हणत अमित शहांनी टीका केली आहे.

हे ही वाचा

‘भाजपा वाजपेयींची राहिली नाही’

देशात डेंग्यूचं सावट; राज्य तिसऱ्या क्रमांकावर

वूमन्स आयपीएलमध्ये काशवी गौतमवर सर्वाधिक बोली ‘या’ संघाने मोजले कोट्यवधी

कलम ३७० का हटवण्यात आलं नाही

विलिनीकरणासाठी शेख अब्दुल्ला यांच्यामुळे विलंब झाला. राज्याचे जरी विलीनीकरण झालं असलं तरी कलम ३७० का हटवण्यात आलं नाही. यासाठी कोणी मान्यता दिली आणि अट कोणी घातली याची उत्तर जनतेला द्यावी लागतील, असे अमित शहा म्हणाले आहेत.

१९४७ सालात जम्मू आणि काश्मीरमध्ये नेहरूंनी सैन्य पाठवण्यासाठी विलंब केला होता. सरदार वल्लभभाई पटेलांच्या सांगण्यावरून नेहरूंनी सैन्य पाठवले. हे मी म्हणत नाही तर नेहरू मेमोरिअल पुस्तकात नेहरूंनी स्वतः मान्य केलं आहे. चुकीच्या कलमामागे ते संयुक्त राष्ट्रासोबत गेले. काश्मीरमधील ठराविक कुटुंब सरकार चालवत असल्याचा खळबळजनक दावा अमित शहा यांनी केला आहे.

कलम ३७० मुळे फुटीरतावाद तयार झाला

सुप्रीम कोर्टाने ३७० कलम हटवण्याबाबत मान्यता दिली. मात्र काँग्रेसने याबाबत अमान्य केले. हा विषय केवळ हिंदू- मुस्लिमांचा नाही. काश्मीरमध्ये जेवढे मुस्लिम नाहीत तेवढे उत्तर प्रदेश, गुजरात आणि असाममध्ये आहेत. मात्र फुटीरतावादी विचारसरणी नव्हती. ३७० कलमामुळे ती तयार झाल्याचं अमित शहा म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी