28 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमुंबईमुंबईत अतिरिक्त टोल वसूली सुरूच; खर्च १ हजार कोटी, वसूली ३ हजार...

मुंबईत अतिरिक्त टोल वसूली सुरूच; खर्च १ हजार कोटी, वसूली ३ हजार कोटींपर्यंत होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अनेकदा मोफत टोल आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत अनेकदा सरकारकडे प्रश्न उपस्थित करत होते. काही महिन्याआधी राज ठाकरेंनी टोलवरील कर आणि वाहतूकीवर प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेला दुजोरा दिला असून मुंबईत अतिरिक्त टोल वसुलीची सरकारने कबुली दिली आहे. कॉंग्रेस आणि विधीमंडळातील सदस्यांनी सरकारकडे रस्त्याचा खर्च कमी झाला तरी टोलबाबत विचारणा केली होती. टोलवसुलीचं उद्दीष्ट साध्य करूनही राज्यात टोलवसुली सुरू असल्याची कबुली सरकारने दिली आहे. तर रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सरकार पैसे वसूल करते, अशी महिती समोर येत आहे.

टोल वसुली सुरूच आहे मात्र रस्त्यांची दुरवस्था असल्याचं चित्र पाहायला मिळते ही बाब खरी आहे का? असा सवाल केला असता मंत्री दादा भुसेंनी यावर हे काही अंशता प्रमाणात खरं असल्याचं सांगितलं आहे. एकूण १० प्रकल्पावर टोलवसुली अधिक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच मुंबईमध्ये १ हजार २५९ कोटी खर्च झाला असून हाच खर्च येत्या २०२६ वर्षात ३ हजार २७२ कोटी आकडा जाणार आहे. अर्थातच येत्या काळातही टोसवसुली सुरूच राहणार आहे.

हे ही वाचा

काश्मीर प्रश्नाला उशीर का झाला? अमित शहांचा कॉंग्रेसला सवाल

‘भाजपा वाजपेयींची राहिली नाही’

‘सरकारला फुटला घाम’; युवा संघर्ष यात्रेचं फेसबुक पेज हॅक

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. यावेळी दादा भुसे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. अशातच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यात टोलच्या मुद्द्यावरून निर्णय घेण्यात आले आहेत.

रस्त्यात खड्डे मग टोल कशासाठी?

रस्त्यात खड्डे अधिकाधिक आहेत. मग यावर टोलवसुली का केली जाते असा सवाल आता वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांनी टोलनाक्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छ शौचालयाची सुविधा करण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी