36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाJasprit Bumrah Injury : बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला भारतीय संघात संधी; शमीला...

Jasprit Bumrah Injury : बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला भारतीय संघात संधी; शमीला पुन्हा डावलले

सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून वेगवान गोलंदाज मोदम्मद सिराजला संघाकडून बोलावणे आले आहे.

सध्या भारतीय क्रिकेय संघात दुखापतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशातंच गुरुवारी (29 सप्टेंबर) अचानकपणे भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुढील 6 महिनयांसाठी क्रिकेट खेळू शकणार नसल्याची बातमी समोर आली. याचाच अर्थ असा की जसप्रीत बुमराह पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आधीच भारताचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे, आणि आता बुमराहच्या दुखापतीमुळे आता टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातंच सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून वेगवान गोलंदाज मोदम्मद सिराजला संघाकडून बोलावणे आले आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले अशा परिस्थितीत त्याला आशिया चषक 2022मध्ये सहभागी होता आले नव्हते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने संघात पुनरागमन केले. मात्र, पहिल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली असल्याची माहिती कर्मधार रोहित शर्माने दिली होती. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बुमराहच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सध्या टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया बुमराहच्या जागी बदली खेळाडूचा शेध घेत आहे.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार, अजित पवारांचा टोला

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

Organic Fertilizers : ‘या’ राज्यातील महिला बनवतात जैवीक खत

सध्या संघात स्थान मिळालेल्या सिराजने फेब्रुवारीमध्ये धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 5 टी20 मध्ये 10.45 च्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट घेतल्या आहेत. टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातही सिराजचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलेला नाही. निवड समितीने मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली आहे. बुमराह टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे सिराज राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी बुमराह टीम इंडियाचा सर्वात महत्तवाचा खेळाडू मानला जात होता. याचे प्रमुख कारण म्हणजे ऑस्ट्रेलियामधील मैदानात असेलली खेळपट्टी. यावर अनेकदा वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त मदत मिळत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आता बुमराहप्रमाणे गोलंदाजी करू शकणारे खेळाडू म्हणून भारताकडे मोहम्मद शमी, दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हे प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी