33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीय"८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे", अजित पवारांचा शरद पवारांना नाव...

“८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे काम करावे”, अजित पवारांचा शरद पवारांना नाव न घेता सल्ला

राजकारण म्हटले की, आरोप प्रत्यारोप हे ओघाने येतातच. सध्या राजकारणामध्ये खासकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलेच धक्कादायक, आश्चर्यकारक वळण येत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष नेहमीच महाराष्ट्राकडे लागलेले असते. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट निर्माण झाले आणि एकच मोठा धमाका झाला. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. पुढे अजित पवार गटाने सत्तेमध्ये येत शिंदे गट आणि भाजपाशी हातमिळवणी केली. या सगळ्यानंतर आता सुरु आहेत ते एकमेकांवर आरोप करणे, टोमणे, टोले मारणे. एकही मंच या नेत्यांचा असा जात नाही, जिथे विरोधकांवर टीका होणार नाही.

नुकताच नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिर या दालनात चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी काही कलाकारांसह अनेक मोठे नेते मंडळी देखील उपस्थित होते. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोले लगावत उपरोधात्मक सल्ले देखील दिले.

हे ही वाचा

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी सुरू

‘आव्हाड समोर आले तर वध करणार’

६.५ कोटी रूपयांचं खानपानाचं बिल, सरकार कोणावर किती खर्च करतं?

अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले, “मी काही लेचापेचा नाही. मी जी वस्तुस्थिती आहे, ती स्पष्टपणे मांडतो. तुमच्यासमोर एक आणि पाठीमागे एक बोलायचे असा माझा स्वभाव नाहीये. गेल्या ३०-३५ वर्षाच्या आयुष्यातील गोष्टी ऐकल्यास, तुम्हाला देखील वाटेल, की आता या लोकांना संधी दिली पाहिजे. ८०-८५ वर्षाच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद देण्याचे, सल्ले देण्याचे काम केले पाहिजे. मला माहित आहे हे राजकीय व्यासपीठ नाही. मात्र मी लवकरच राजकीय व्यासपीठावर माझी भूमिका मांडेल,” असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका करत “प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. मात्र आज पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावणार?” असे वक्तव्य अमोल कोल्हेंनी केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी