30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयशिक्षकांनी शनिवार-रविवारी जादा तास घ्यावेत : अजित पवार

शिक्षकांनी शनिवार-रविवारी जादा तास घ्यावेत : अजित पवार

टीम लय भारी

मुंबई:- कोरोनामुळे गेल्या पावणे दोन वर्षांत शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवलं जातंय हे सामजण्यात अडचण येत आहेत. तर अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षणापासून वंचित राहात आहेत.(Ajit Pawar, Teachers take extra hours on Saturdays and Sundays)

कोरोना महामारीमुळे पावणेदोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी, शनिवार-रविवारी सुटी न घेता विद्यार्थ्यांचे जादा तास घ्यावेत.

हे सुद्धा वाचा

पुण्यातील शाळा ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची माहिती

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

50% dip in active Covid cases, peak not over in Pune: Maharashtra deputy CM Ajit Pawar

सामाजिक दायित्व व नैतिकता समजून कोणताही विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून बाहेर पडू नये यासाठी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ऑनलाइन शिक्षण व प्रत्यक्षातील शिक्षणामध्ये मोठी तफावत आहे. नैतिक मूल्यांची जपणूक ही प्रत्यक्षातील शिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळू शकते. शिक्षकांनी शनिवारी व रविवारी सुटी न घेता प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहून अध्यापन केले तर हे काम भविष्यातील पिढ्या कदापि विसरणार नाहीत, असे पवार म्हणाले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम राज्यभरात राबवला गेला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.

Let's go to Kashmir with Sarathi Holidays to enjoy the beautiful nature

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी