29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयअजित पवार भाजपसोबत...; शरद पवार स्पष्टचं बोलले

अजित पवार भाजपसोबत…; शरद पवार स्पष्टचं बोलले

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांपासून राजकरणात चांगलाच धुमाकूळ घातला होता. कार्यकर्त्यांसोबतच सत्ताधारी सुद्धा गोंधळात पडले होते. अखेर या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. अजित पवार हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात इंटरेस्ट असतो, तर काहींचा वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत, हे बऱ्याचशा पत्रकारांना माहीत आहे, अशा शब्दांत खुद्द शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, काही लोक असा प्रचार करतात. ती त्यांच्या कामाची पद्धत असते. अजित पवार यांचा अप्रोच हा सातत्याने काम करण्याकडे आहे. ते फार ‘मीडिया फ्रेंडली’ नाहीत, हे तुम्हालाही माहिती आहे. काही लोक काम करणारे असतात, तर काही लोक फक्त वृत्तपत्रांत नाव येण्यासाठी काम करणारे असतात. अजित पवार यांना वृत्तपत्रांत नाव कसे येईल, याची कधीही चिंता नसते. त्यांना आपण हातात घेतलेले काम पूर्ण कसे होईल याची चिंता असते. तुम्ही जे म्हणता, असे काही नाही. ते त्यांचे काम करत आहेत आणि त्यांचे काम राष्ट्रवादीसाठी आणि राज्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे.

दरम्यान किमान समान कार्यक्रमबाबत पवार म्हणाले, कोणताही एक राजकीय पक्ष देशात पर्याय देऊ शकत नाही, त्यामुळे अनेक पक्षांनी एकत्र येण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणावी लागेल, याबाबत नितीश कुमारांसह अनेकजण काम करत असून, ‘किमान समान कार्यक्रम’ वर काम सुरू आहे. या सर्वांना मदत करून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपला पर्याय उभा करता आला, तर त्याची जास्त गरज आहे आणि या कामात माझा सहभाग असेल, असे पवारांनी स्पष्ट केले.

किमान समान कार्यक्रम म्हणजे?
परस्परविरोधी, भिन्न विचारांचे राजकीय पक्ष आघाडी करून सरकार स्थापन करतात, तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार केला जातो. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने CMP चा विचार करायचा तर, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना आणि पूर्णपणे वेगळी-धर्मनिरपेक्षतेची विचारधारा मानणारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांना बांधून ठेवणारा धागा म्हणजे किमान समान कार्यक्रम, असं म्हणता येईल. आपापल्या विचारधारा थोड्या बाजूला ठेवून जनकल्याणाचे विषय, विकासकामं पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आखलेली सर्वांना मान्य असेल अशी रूपरेषा म्हणजे किमान समान कार्यक्रम!

हे सुद्धा वाचा : 

राजीनाम्याचा विषय संपला, आता कामाला लागा: शरद पवार

शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय मागे; पक्षाध्यक्षपदी कायम राहणार

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

Ajit Pawar, Sharad Pawar, NCP, Ajit Pawar will not go with BJP; NCP Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी